गुरुवारी (१७ ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरच्या झैनापोरा शोपियान भागात दहशतवाद्यांनी एका गैर-स्थानिकाची गोळ्या झाडून हत्या केली. मृत व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यासाठी सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहे.
या प्रकरणी आता सुरक्षा दलाने तपास सुरु केला आहे. दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडण्यात आलेल्या गैर-स्थानिक व्यक्तीचे नाव समोर आलेले नाही. या महिन्याच्या सुरुवातीला, जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन जवानांचे अपहरण केले होते. यातील एक जवान मृतावस्थेत सापडला होता, त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा होत्या, असे पोलीस सूत्रांनी बुधवारी, ९ ऑक्टोबर रोजी सांगितले.
हे ही वाचा :
अदानींना १०८० एकर जागा दिल्याचा कॅबिनेट निर्णय आदित्य ठाकरेंनी दाखवावा
उत्तराखंडमध्ये डेहराडून एक्सप्रेस उलटवण्याचा कट; रेल्वे रुळावर आढळला १५ फुटांचा लोखंडी रॉड
बहराइच घटनेवर तोंड बंद; अखिलेश यांचा हिंदूविरोधी डीएनए दिसतो!
५ कोटी न दिल्यास सलमानची अवस्था बाबा सिद्दींकीपेक्षा वाईट करण्याची धमकी
८ ऑक्टोबर रोजी लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या १६१ युनिटशी संबंधित दोन सैनिकांचे अनंतनागमधील जंगल परिसरातून अपहरण करण्यात आले होते. यातील एक जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून यशस्वी सुटून आला होता. विशेष म्हणजे या जवानाला दोन गोळ्या लागल्या होत्या.