पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक घेऊन पाकिस्तानला दणके देणारे महत्त्वाचे निर्णय घेतले. याशिवाय दहशतवाद्यांवर आणि हल्ल्याच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. यानंतर नरेंद्र मोदी यांनी बिहार दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार करत पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यांनी भाषण करण्यापूर्वी दोन मिनिटे मौन बाळगत पहलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाणार, असा थेट इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, “२२ तारखेला दहशतवाद्यांनी पर्यटकांना अत्यंत क्रूरपणे मारलं. संपूर्ण देश व्यथित असून देशवासी दुखी आहेत. या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा गमावला, कुणी भाऊ गमावला, कुणी जीवनसाथी गमावला आहे. कुणी बांगला बोलत होतं. कोणी कन्नड बोलत होतं. कोणी मराठी, कोणी ओडिया, कुणी गुजराती, तर कुणी बिहारचा लाल होता,” असं नरेंद्र मोदी म्हणाले. दहशतवाद्यांना शिक्षा मिळणारच. दहशतवाद्यांना मातीत मिळवण्याची वेळ आली असून १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचं कंबरंडं मोडणार आहे, असा निर्धार नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवला. “पहलगाममधील हा हल्ला निःशस्त्र पर्यटकांवर झाला नाही. देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. पण, दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही,” असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा..
आरोग्यासाठी वरदान, कोथिंबिरीचे असंख्य फायदे
धर्म विचारून गोळ्या माराल तर हिंदू शांत बसणार नाही, विटेला दगडाने उत्तर देवू!
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाखांचे बक्षीस
भारताची पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कारवाई, पाकिस्तानचे ‘एक्स’ अकाउंट केले बंद!
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना ओळखेल, त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं कटकारस्थान रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार आहे,” असा इशाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून दिला आहे. तसेच, उनकी बची-खुची जमिन को भी मिठ्ठी मे मिलाने का समय आ गया है… अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.