जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर येत आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत लष्कराला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आहे, तर दुसरा दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती लष्कर आणि पोलिसांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाचे पथक सक्रिय झाले. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आणि संबंधित परिसराला प्रथम सील करण्यात आले. त्यानंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पुलवामाच्या फीसीपुरा भागात दहशतवादी लपून बसले होते. स्थानिक लोकांना याची माहिती दिल्यानंतर सुरक्षा दलांनी आधी संपूर्ण परिसर सील केला, जेणेकरून दहशतवादी पळून जाऊ नयेत. त्यानंतर त्यांच्याविरोधात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी काही क्षणात दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. लष्कराच्या जवानांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार केला. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांकडून सातत्याने शोधमोहीम सुरू आहे.
हे ही वाचा:
आचारसंहितेदरम्यान पुणे, नागपूरमधून लाखोंची रोख रक्कम जप्त
पतंजलीला फटकारत सर्वोच्च न्यायालयाने माफीनामा फेटाळला
इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या नेत्याचे तीन मुलगे ठार
शुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय
दोन्ही दहशतवादी काही मोठा कट रचण्याच्या उद्देशाने पुलवामा येथे आश्रय घेत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. ते कोणतीही घटना घडवण्याआधी गुप्त माहितीच्या आधारे लष्कराला त्यांचे लोकेशन मिळाले. यानंतर गुरुवारी(११ एप्रिल) सकाळीच लष्कर आणि स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई सुरू केली.या कारवाईत एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे.