जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान!

एक पोलीस हुतात्मा, शोध मोहीम सुरु

जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान!

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी रविवारी (२९ सप्टेंबर) एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, या गोळीबारात एका पोलिसाला वीर मरण आले आहे. या कारवाईत काही सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाची शोध मोहीम सध्या सुरू आहे. २८ सप्टेंबर रोजी कठुआच्या मांडलीमध्ये दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम सुरु केली. याच दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला.

या भागात तीन-चार दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. शोध मोहीम सुरू आहे. हे परदेशी दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे, शोध मोहिमेनंतर अधिक तपशील समोर येतील, असे एका उच्च पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : 

उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध, खोदलेला खड्डा बुजवला!

शहरातील कामगारांच्या गरिबीचा स्तर जाणून घेण्यासाठी होणार सर्व्हे

सोमनाथ मंदिराजवळील बेकायदेशीर मशीद, कब्रस्तान आणि दर्गा जमिनदोस्त

काँग्रेसच्या सभांमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

दरम्यान, कुलगामच्या आदिगाम भागात कालच्या सुरक्षा दलाच्या शोध मोहिमे दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. त्यांच्याकडून एके-४७सह दारूगोळा जप्त करण्यात आला. या कारवाई दरम्यान लष्कराचे पाच जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.

Exit mobile version