केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये दौरा केला. कलम ३७० रद्द केल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहा काश्मीर दौऱ्यावर आहेत.
तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शहा यांनी संध्याकाळी जम्मू-काश्मीर क्लबमध्ये तरुणांशी संवाद साधला. तरुणांना संबोधित करताना ते म्हणाले की, ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केल्याने खोऱ्यातील दहशतवाद, फुटीरतावाद आणि भ्रष्टाचाराचा अंत झाला.
.@JmuKmrPolice के शहीद जवान परवेज अहमद दार के घर जाकर उन्हें श्रद्धांजलि दी। मुझे व पूरे देश को उनकी बहादुरी पर गर्व है। उनके परिजनों से भेंट की और उनकी पत्नी को सरकारी नौकरी दी।
मोदी जी ने जो नए J&K की कल्पना की है, उसको साकार करने के लिए J&K पुलिस पूरी तन्मयता से प्रयासरत है। pic.twitter.com/Krv6CNfdJu
— Amit Shah (@AmitShah) October 23, 2021
जम्मू -काश्मीरमध्ये आल्यावर, शाह थेट पोलीस निरीक्षक परवेझ अहमद यांच्या कुटुंबाला भेटायला गेले. अहमद यांची दहशतवाद्यांनी २२ जून रोजी श्रीनगरच्या बाहेरील नौगाम येथील त्यांच्या घराजवळ गोळ्या घालून हत्या केली होती.
शहा यांनी कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि अहमदच्या विधवा फातिमा अख्तर यांना सरकारी नोकरीत नियुक्तीची कागदपत्रे सुपूर्द केली. हे माहिती गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितली.
हे ही वाचा:
वेंकटेश प्रसाद-आमिर सोहेल चकमकीच्या आठवणी झाल्या ताज्या
मास्क न घालणारे राज ठाकरेच कोरोनाग्रस्त
अखेर फैजाबाद स्थानकही बनले अयोध्या
‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च
सरकारी आकडेवारी सांगते की ९७ तरुण (स्थानिक रहिवासी) दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी आपले घर सोडून गेले होते. यापैकी ५६ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. अनेक पिस्तुल घेऊन केलेले गोळीबार हे सूचित करतात की ते हिंसक होत आहेत. असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.