जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सुरक्षा दल देखील दहशतवाद्यांवर नजर ठेवून असून वेळोवेळी शोधमोहीम राबवून कारवाई केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांना स्थानिक लोकांचा पाठींबा कमी मिळत आहे आणि त्यांच्याविरुद्ध अचूक कारवायाही केल्या जात आहेत. राज्यात ११९ दहशतवादी सक्रिय असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. त्यापैकी ७९ पीर पंजालमध्ये आहेत. यामध्ये १८ स्थानिक तर ६१ पाकिस्तानी आहेत. पीर पंजालच्या दक्षिणेस ४० सक्रिय दहशतवादी आहेत. त्यापैकी ३४ पाकिस्तानी नागरिक आहेत, तर केवळ ६ स्थानिक दहशतवादी आहेत.
हे ही वाचा :
व्ही. एन. देसाई रुग्णालयात प्रसुतीनंतर आई, नवजात मुलाचा मृत्यू
‘व्होट जिहाद’ साठी पैशांचा वापर
हा तर बालीशपणा, उद्धव ठाकरेंच्या प्रचारांवर बंदी आणावी!
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
अमर उजालाच्या बातमीनुसार, चालू वर्षात आतापर्यंत २५ दहशतवादी घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये २४ जवानांना वीर गती प्राप्त झाली असून गेल्या वर्षी २७ जवानांनी आपले बलिदान दिले होते. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत या वर्षी ६१ दहशतवादीही मारले गेले. त्यापैकी ४५ अंतर्गत भागात आणि १६ नियंत्रण रेषेवर मारले गेले. यापैकी २१ पाकिस्तानी होते.