अमरावती जिल्ह्यतील चिखलदरा जवळ एक एसटी बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.या एसटी बसमध्ये २० हुन अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत.जखमींमध्ये ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा सेमाडोह घटांग रस्त्यावर ही बस दरीत कोसळली.वळणघाट रस्ता असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते. ही बस परतवाडा ते तुकईथळ इथे जात असताना हा अपघात झाला.या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
हे ही वाचा :
केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!
खजिन्याच्या शोधासाठी निघाले होते, कारमध्ये मिळाले जळालेले तीन मृतदेह!
दिग्विजय सिंग, कार्ति चिदंबरम काँग्रेसच्या चौथ्या यादीत
अपघात झालेली बस परतवाडा आगाराची असून रविवारी(२४ मार्च) ११.३० च्या सुमारास हा अपघात झाला.चालकाचे नियंत्रण सुटल्याने ३० फूट खोल दरीत बस कोसळली.अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले होते.बस मधील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे.