आजपासून दहावीची परीक्षा; तासभर आधी उपस्थित राहा

आजपासून दहावीची परीक्षा; तासभर आधी उपस्थित राहा

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार, १५ मार्चपासून सुरू होत आहे. कोरोना महामारीच्या काळात गेल्या दोन वर्षात परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. परंतु, यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरवले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर एक तासापूर्वी पोहचणं गरजेचे असून परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश मिळणार आहे.
राज्यातील १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा होणार आहे.

हे ही वाचा:

चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणारा ‘द काश्मीर फाइल्स’ लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

डहाणू महोत्सवाने दिला स्थानिकांना आर्थिक हातभार

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

फडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! ‘न्यूज डंका’ च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत

“करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करावा लागला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा ऑफलाईन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली आहे, तर १५ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी करोना बाधित झाल्यास किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्यास ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतली जाईल,” अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. तर पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन आहे.

Exit mobile version