28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषठाण्यात भिंत कोसळून दहा गाड्यांचे नुकसान

ठाण्यात भिंत कोसळून दहा गाड्यांचे नुकसान

Google News Follow

Related

मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी भागात काल घडलेल्या घटनांनी महापालिकेचे धाबे दणाणले आहे. अशावेळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानाला लगाम लागताना दिसत नाहीये. काल मुंबई महानगरपालिकेत तर आज ठाण्यात नुकसान पाहायला मिळालं. पावामुळे काल ठाण्यात एक भिंत कोसळली. कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पाच कार आणि पाच दुचाकींचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा मुल्ला भागातील कॉसमॉस इमातीत ही दुर्घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंतीचा ढिगारा पडून ५ चारचाकी आणि ५ दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या पथकासह जेसीबी दाखल झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याआधी, मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी या भागात पावसामुळे शनिवारी रात्री दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने २१ जणांना प्राण गमवावे लागले, आणि दोघे जखमी झाले. तर विक्रोळीत घरांवर दरड कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला. शक्यता आहे.

दुसरीकडे, अंबरनाथ शहर आणि परिसरात रविवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीचा प्रवाह प्रचंड वाढला. त्यामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा पूल पाण्याखाली गेला होता.

हे ही वाचा:

महापालिकेच्या पार्किंगमध्ये ४०० गाड्यांना जलसमाधी

महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रदीर्घ आयुष्य लाभो

वारकऱ्यांसाठी पंढरपूरची एकही एसटी नाही

जय हो! लडाखमध्ये चार नवे विमानतळ आणि ३७ हेलिपॅड

अंबरनाथजवळच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला रविवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मोठा प्रवाह आला होता. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात तर या नदीने अक्षरशः रौद्ररुप धारण केलं होतं. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे वालधुनी नदीवर असलेला शिव मंदिरात जाणारा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे शिवमंदिरात जाणारा रस्ता काही काळासाठी बंद झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा