29 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषमालाड सामान्य रुग्णालयात तीन महिन्यांत दहा डायलेसिस मशीन सुरू करणार

मालाड सामान्य रुग्णालयात तीन महिन्यांत दहा डायलेसिस मशीन सुरू करणार

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

Google News Follow

Related

मालाड सामान्य रुग्णालय येथे मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृहामुळे रुग्णांना निर्जंतुक वातावरण उच्च प्रतीची आरोग्य सेवा मिळणार असून, माता मृत्यू तसेच नवजात शिशू मृत्यूदराचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल. तसेच आगामी तीन महिन्यात दहा डायलेसिस मशीन देखील बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.

मालाड येथील सामान्य रुग्णालय येथे शस्त्रक्रिया गृह व प्रसूतीगृहाचे अत्याधुनिकरण या कामाचे उद्घाटन करताना पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, स्थानिक नगरसेवक, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, व इतर अधिकारी उपस्थित होते.

मंगल प्रभात लोढा म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सामान्य रुग्णालयात मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर व प्रसूतीगृह हे प्रतिजैविक व पृष्ठभाग (Antimicrobial surface) व निर्जंतुकीकृत हवा ( Laminar sterilized air flow) असल्यामुळे रुग्णांना कोणत्याही प्रकारे तीव्र संसर्ग आणि इतर रोगराईपासून प्रतिबंध करण्यास सहाय्य ठरणारी अशी ही यंत्रणा आहे. या नव्या सुविधेमुळे रुग्णांना निर्जंतुक वातावरण, उच्च प्रतीची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

हे ही वाचा:

भारत जगाचे औषधालय बनला असून, आता जगाचा उत्पादक बनण्याची वेळ

राज्यात सॅटेलाईट कॅम्पसमुळे स्थानिक पातळीवर रोजगार मिळतील

नाशिक महामार्गाच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाकरे गटाने नाणारला विरोध करुन पाकिस्तानला मदत केली?

देशात माता व नवजात शिशू मृत्युचे मुख्य कारण हे जंतूसंसर्ग (इन्फेक्शन्स) आहे. हा धोका कमी करून मॉड्यूलर प्रसूतीगृह हे जंतूसंसर्गाचा धोका कमी करून माता मृत्यू तसेच नवजात शिशू मृत्यदराचे प्रमाण कमी करण्यास उपयोगी ठरेल. राज्य शासनाचे एकमेव सामान्य रुग्णालय मुंबई उपनगरात कार्यरत असून ते अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व मॉड्युलर प्रसूतीगृह याने सुसज्ज करण्यात आल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा