फुटबॉल सामना चालू असताना गॅलरी कोसळली आणि….

फुटबॉल सामना चालू असताना गॅलरी कोसळली आणि….

केरळमधील मलप्पुरम येथील पुंगोड येथे फुटबॉल सामन्यादरम्यान उभारण्यात आलेली गॅलरी कोसळल्याची धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या दुर्घटनेत सुमारे २०० लोक जखमी झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सामना सुरू होण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अपघाताचा हा व्हिडीओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

फुटबॉल सामना पाहता यावा म्हणून प्रेक्षकांना बसण्यासाठी मैदानावर तात्पुरती गॅलरी उभी केली होती. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे या गॅलरीमध्ये अनेक नागरिक गर्दी करून बसले होते. सामना सुरू होण्यापूर्वीची ही घटना असावी. मैदानात दोन संघ दिसत आहेत. तर प्रेक्षकांची संख्याही जास्त दिसत आहे. त्यानंतर अचानक ही गॅलरी कोसळली आणि मैदानावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

हे ही वाचा:

कच्चे तेल, पक्का इरादा

टाटा घेऊन येणार नवे डिजिटल पेमेंट ऍप

‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा

या दुर्घटनेमध्ये सुमारे २०० जण जखमी झाले तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा गॅलरीत दोन हजारांहून अधिक लोक सामना पाहण्यासाठी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. गॅलरी पूर्ण भरल्यानंतरही आयोजकांनी कार्यक्रमात पाहुण्यांची ये-जा थांबवली नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आता याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version