सध्या दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षा तोंडावर आलेल्या असताना आता नाशिकमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संगमनेर येथे एका टेम्पोला रस्त्यात आग लागली असून या आगीत टेम्पो जळून खाक झाला आहे. तर टेम्पोमध्ये असलेल्या प्रश्नपत्रिका देखील जळून खाक झाल्या आहेत.
काल भोपाळ येथून हा टेम्पो प्रश्नपत्रिका घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला होता. नाशिक पुणे महामार्गावरून जात असताना चंदनापुरी घाटात संगमनेर येथे या टेम्पोला अचानक आग लागली. त्यानंतर हा टेम्पो संपूर्ण जळून खाक झाला. त्याच बरोबर या टेम्पोमधलं सामान देखील जळून खाक झाले आहे. टेम्पोमधील हे सर्व कागद दहावी बारावीच्या प्रश्नपत्रिका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या टेम्पोला पहाटे साडेसहाच्या सुमारास आग लागली. आग विझवण्यात अग्निशामन दलाला यश आले असले तरी नुकसान झाले आहे.
हे ही वाचा:
ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक आनंदी का होते?
तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी
‘अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर अनिल परबांचा’
ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पाहाणी केली आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिका दहावी बारावीच्याच होत्या का? आणि असतील तर आता त्या पुन्हा छापणार का, किती वेळ लागणार याची माहिती समोर येणं अपेक्षित आहे.