26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषआणि चक्क टेम्पोने घेतला कारचा बदला

आणि चक्क टेम्पोने घेतला कारचा बदला

व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल

Google News Follow

Related

एखाद्या गोष्टीचा बदल घेण्याची वृत्ती कधीही वाईटच. पण तरीही अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतातच. अमुकच्या खुनाचा बदला तमुकचा खून करून घेतला.. आधी कधीतरी झालेल्या भांडणाचा बदला वळला करून घेतला वगैरे वगैरे. माणसातील वृत्ती तसे त्याला करायला भाग पाडत असते. माणसाचे ठीक आहे हो. पण आता निर्जीव वस्तू पण असा बदला घेऊ लागल्या तर काय म्हणाल. असेच झाले आहे. एका लहानग्या टेम्पोने एका कारचा बदल घेतला आहे. खरे वाटत नाही ना.. पण तसेच काहीसे झाले आहे आणि हा बदला देखील अपघाताचा बदला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना कोणत्या शहरात घडली ते या व्हिडिओमध्ये कळत नाही.पण अपघात होताना दिसत आहे. एका मोठ्या चौकातून एक कार जात आहे आणि त्या कारच्या मागून एक टँकर येत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर अजिबात गर्दी दिसत नाही. समोरून येणाऱ्या टँपोला या कारची धडक बसते. धडक बसल्यावर या लहान टेम्पोची जाण्याची दिशाच बदलते. ती कार तिथेच स्तब्ध उभी राहते.

हे ही वाचा:

‘अजित पवारांची कुणालाही गॅरंटी नाही’

‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’

एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार

दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती

अपघात झाल्यावर टँकरही थोडावेळ थांबतो. इतक्यात हा लहान टेम्पो विरुद्ध दिशेने जातो आणि टँकरच्या मागून गोल वळसा घेऊन येतो. आतापर्यंत थांबलेला टँकर इतक्यात पुढे सरकतो. हे टेम्पला बहुधा कळत नाही कदाचित. हा टेम्पो जोराने मागून येत कारला धडकतो आणि तसाच कारला घेऊन पुढे जातो असे बघायला मिळते.

ही दोन्ही वाहने चालवणारी माणसेच असली तरी. बघताना मात्र एका लहान टेम्पोने मोठ्या कारने केलेल्या कृत्याचा बदलाच जणू घेत आहे असे दिसते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अपघातातचे व्हिडिओ सोहळा मीडियावर बघायला मिळतात. खूप गंभीर अपघात होऊनही दैव बलवत्तर म्हणून जीव वाचल्याचे बघितल्यावर आपल्यालाही क्षणभर छातीत धस्स होते. पण हा अपघात बघितल्यानंतेर टेम्पोने कारचा बदल घेतला असेच क्षणभर मनात येऊन जाते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा