तापमान; दर पाच वर्षांनी विक्रमी उष्णतेच्या लाटा !

वाढत्या उष्म्याची झळ यंदा भारतात तीव्रतेने जाणवली.

तापमान; दर पाच वर्षांनी विक्रमी उष्णतेच्या लाटा !

एप्रिलमध्ये भारतातील बहुतेक भागांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला. मात्र ताज्या संशोधनानुसार, अशाप्रकारे विक्रमी उष्णतेच्या लाटांचा सामना दर पाच वर्षांनी करावा लागू शकतो. मानवामुळे होणारे हवामान बदल याला कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे जितके तापमान असू शकले असते, त्यापेक्षा ३० पटींनी अधिक तापमान सोसावे लागणार आहे, असेही या संशोधनात म्हटले आहे.वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन (WWA) उपक्रमाचा भाग म्हणून हवामान शास्त्रज्ञांच्या जागतिक संघाने भारत, बांग्लादेश, थायलंड आणि लाओ पीडीआर – या विक्रमी तापमान नोंदवले गेलेल्या देशांचा अभ्यास केला.

या देशांत गेल्या महिन्यात उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचे आढळून आले आहे.दोन प्रदेशांमध्ये एप्रिलमध्ये सलग चार दिवस सरासरी कमाल तापमान आणि कमाल उष्णता निर्देशांक पाहण्यात आला. यामध्ये दक्षिण आणि पूर्व भारत आणि बांगलादेश आणि दुसरा संपूर्ण थायलंड आणि लाओसचा समावेश आहे. डब्ल्यूडब्ल्यूएनुसार, उष्णता निर्देशांक हे तापमान आणि आर्द्रता एकत्रित करणारे आणि मानवी शरीरावर उष्णतेच्या लहरींचे परिणाम अधिक अचूकपणे प्रतिबिंबित करणारे एक मापन आहे. संशोधकांना असे आढळून आले की, दोन्ही प्रदेशांमध्ये हवामान बदलामुळे हे भाग किमान २ अंश सेल्सिअस अधिक उष्ण झाले आहेत.

हे ही वाचा:

इम्रान खान यांना पुन्हा अटकेची भीती!

हेरगिरी प्रकरणःपत्रकारआणि नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक !

प्रशांत किशोर म्हणाले, ‘कर्नाटकच्या निकालाला गृहित धरू नका’

सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; शिवकुमार उपमुख्यमंत्री

“जोपर्यंत संपूर्ण हरितगृह वायूंचे उत्सर्जन थांबवले जात नाही, तोपर्यंत जागतिक तापमान वाढतच जाईल आणि अशा घटना अधिक वारंवार आणि तीव्र होतील,’ असे या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.बांगलादेश आणि भारतात, उष्णतेच्या लाटेच्या घटना एका शतकात सरासरी एकापेक्षा कमी वेळा घडत असत. आता मात्र तापमानात २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊन या लाटा पाच वर्षांतून एकदा होण्याची शक्यता आहे. हे बाकीच्या वेळी साधारण ३० वर्षांत घडले असते. उत्सर्जन वेगाने कमी न केले गेल्यास या घटना किमान दर दोन वर्षांनी होतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

वाढत्या उष्म्याची झळ यंदा भारतात तीव्रतेने जाणवली. भारतात या वर्षी १३ ते २० फेब्रुवारीदरम्यान जंगलात आगी लागण्याच्या १,१५६ घटना घडल्या. दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये सर्वसाधारणपणे उच्च तापमान असते. मात्र शास्त्रज्ञांच्या मते सुरुवातीच्या उष्णतेच्या लाटा विशेषतः हानीकारक असतात. ते कमी करण्याच्या उपायांमध्ये सुधारणा करण्याची आणि सर्वसमावेशक उष्मा कृती योजनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version