ॲनिमल या चित्रपटाच्या प्री-रिलीझ कार्यक्रमादरम्यान अभिनेता रणबीर कपूरला बीआरएस नेते चमकुरा मल्ला रेड्डी म्हणाले, येणाऱ्या पाच वर्षात तेलुगू लोक हॉलीवूड आणि बॉलीवूडवर वर्चस्व गाजवतील.तसेच मुंबई आता जुनी झाली आहे, बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरही लवकरच हैदराबादला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हैदराबादमध्ये सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रम दरम्यान बीआरएस नेते चमकुरा मल्ला रेड्डी बोलत होते.
अभिनेता रणबीर कपूरचा ॲनिमल या चित्रपटाच्या प्री-रिलीझच्या कार्यक्रमाचे आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आले होते.चाहत्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधण्यासाठी निर्मात्यांनी हैदराबादमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमावेळी बीआरएस नेते चमकुरा मल्ला रेड्डी म्हणाले की, श्रीमान रणबीर कपूर ऐका, पाच वर्षात हॉलीवूड आणि बॉलीवूडवर तेलुगू लोकांचे राज्य असेल. एक वर्षानंतर तुम्ही देखील हैदराबादला शिफ्ट व्हाल,” रेड्डी मंचावरून म्हणाले.’मुंबई जुनी झाली आहे, बेंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळे देशात एकच शहर आहे ते म्हणजे हैद्राबाद, असे रेड्डी म्हणाले.
हे ही वाचा:
ललित पाटील प्रकरणी ससूनच्या कर्मचाऱ्याला अटक
श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली
वादग्रस्त वक्तव्यानंतर जरांगे पाटलांची माघार; शब्द मागे घेत असल्याची कबुली
बोगद्यात अडकलेल्या मजूरांच्या मानसिक आरोग्यावर स्वदेशी ‘रोबो’ लक्ष ठेवणार
चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमामध्ये दिग्दर्शक एसएस राजामौली, अभिनेता महेश बाबू आणि अनिल कपूर उपस्थित होते.चमकुरा मल्ला रेड्डी पुढे म्हणाले, दिग्दर्शक एसएस राजामौली, निर्माता दिल राजू हे हुशार लोक आहेत.यांच्यासोबत आता दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा हे देखील आले आहेत.आमचे हैदराबाद सर्वात वर आहे. तेलुगू लोक स्मार्ट आहेत, आमची नायिका रश्मिका मंदान्ना खूप स्मार्ट आहे, जिच्या पुष्पा या चित्रपटाने खळबळ माजवली होती.तसेच तुमचा ॲनिमल हा चित्रपट ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमवलं, असे बीआरएस नेते चमकुरा मल्ला रेड्डी म्हणाले.