हिंदूंच्या आंदोलनानंतर हिमाचलमधील मुस्लिम नरमले? मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यास तयार

संजौली मशीदप्रकरणी मशीद व्यवस्थापन समितीची पालिकेकडे मागणी

हिंदूंच्या आंदोलनानंतर हिमाचलमधील मुस्लिम नरमले? मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यास तयार

हिमाचल प्रदेशातील संजौली मशीदप्रकरणी मशीद व्यवस्थापन समितीच्या एका शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त भूपेंद्र अत्री यांची भेट घेतली. या भागातील मुस्लीम हे हिमाचल प्रदेशचे कायमचे रहिवासी असून त्यांना सलोखा आणि बंधुता हवी आहे. त्यामुळे संजौली येथील मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी त्यांनी पालिका आयुक्त अत्री यांच्याकडे परवानगी मागितली आहे.

या शिष्टमंडळात व्यवस्थापन सामीचे सदस्य तसेच मशिदीचे इमाम आणि वक्फ बोर्डचे सदस्य आहेत. संजौली येथील मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी आम्ही शिमला महापालिका आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे, असे समितीचे सदस्य मुफ्ती मोहम्मद शफी कासमी यांनी सांगितले.

हेही वाचा..

धर्मांतरप्रकरणी मौलाना कलीम सिद्दीकी, मोहम्मद उमर गौतमसह १२ जणांना जन्मठेप

चार लाखांच्या सोनसाखळीसोबत बाप्पाच्या मूर्तीचं केलं विसर्जन आणि…

इस्लामच्या नावे चालत होते चैरिटी होम्स, देत होते बलात्काराची ट्रेनिंग, ४०० मुलांचा बचाव !

संजौली मशिदीच्या विरोधात व्यापारीही उतरले, बाजारपेठा बंद !

संजौली मशिदीचे इमाम म्हणाले, आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही अनेक दशकांपासून येथे राहत आहोत. हिमाचली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला शांततेत राहायचे आहे. बंधुभाव टिकला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. या संदर्भात आपल्याला समितीकडून निवेदन मिळाले असल्याच्या वृत्ताला आयुक्त अत्री यांनी दुजोरा दिला.

मशिदीतील अनधिकृत बांधकामाविरोधात आंदोलन पुकारणाऱ्या देवभूमी संघर्ष समितीच्या सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. समितीचे सदस्य विजय शर्मा म्हणाले, आम्ही मुस्लिम समुदायाच्या या निर्णयाचे स्वागत करतो. व्यापक हितासाठी हा पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना सर्वात आधी मिठी मारणार आहोत.

मशिदीतील वादग्रस्त वास्तू पाडण्याची आणि राज्यात येणाऱ्या बाहेरील लोकांची नोंदणी करण्याची मागणी करणाऱ्या हिंदू संघटनांनी बुधवार, ११ सप्टेंबर रोजी संजौली बंदची हाक दिली होती. मशिदीतील काही मजल्यांचे अनधिकृत किंवा बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेल्या गुरुवारी, ५ सप्टेंबर रोजी हिंदू समाजाकडून त्यांच्या मागण्यांसाठी विधानसभा आणि संजौलीच्या परिसरात शिमला येथील चौरा मैदानावर प्रचंड निदर्शने केली होती.

Exit mobile version