तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी (५ सप्टेंबर) सकाळी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाला ६ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. यामध्ये दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
भद्राद्री कोठागुडेमचे जिल्हा अधीक्षक रोहित राज म्हणाले, तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात आज पहाटे ही चकमक झाली. गोळीबारात सहा माओवादी ठार झाले, आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थिती जसजशी विकसित होत जाईल तसतसे ऑपरेशनबद्दल अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
हे ही वाचा :
मुंबई पोलिसांनी काढली ड्रग्स माफियांची वरात, टोळीच्या चार सदस्यांना अटक !
कोलकाता बलात्कार प्रकरण: प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांकडून पैशांची ऑफर
अमेरिकेतील शाळेत १४ वर्षीय विद्यार्थ्याकडून गोळीबार; चार जणांचा मृत्यू
राजकोट पुतळा प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेला अटक
दरम्यान, चकमकीत जखमी झालेल्या दोन्ही सुरक्षा रक्षकांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, चकमकीत सामील असलेले माओवादी हे सचिव लच्छन्ना यांच्या नेतृत्वाखालील मनुगुरु क्षेत्र समितीचा भाग होते. हा गट छत्तीसगडमधून स्थलांतरित झाला होता आणि काही काळापासून या भागात कार्यरत होता. दरम्यान, सुरक्षा दलांचा शोधमोहीम सुरु आहे.