व्हीव्हीआयपी भेटी आणि सार्वजनिक मेळाव्यादरम्यान ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी तेलंगणा पोलीस प्रशिक्षित गरुड तैनात करून इतिहास रचणार आहेत.नेदरलँड्स आणि फ्रान्स सारख्या युरोपियन देशांकडून प्रेरणा घेऊन, शत्रूच्या ड्रोनला रोखण्यासाठी गरुडांना प्रशिक्षण दिले गेले आहे.प्रशिक्षण देऊन तीन गरुडांना तयार करण्यात आले असून यासाठी तेलंगणा पोलिसांना तब्बल तीन वर्षाचा कालावधी लागला आहे.
हैदराबादच्या मोइनाबाद येथील इंटिग्रेटेड इंटेलिजेंस ट्रेनिंग अकादमी (IITA) येथे पोलिस महासंचालक रवी गुप्ता आणि वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षित गरुडांची प्रात्यक्षिते दाखवण्यात आली, ज्यामध्ये प्रशिक्षित गरुडांनी ड्रोन खाली आणत आपली कामगिरी दाखविली. विशेष म्हणजे, देशातील कोणत्याही पोलीस दलाने अशा ऑपरेशनसाठी गरुडांचा वापर केलेला नाही.त्यामुळे तेलंगणा पोलिसांचा हा उपक्रम देशातील पहिलाच आहे.
हे ही वाचा:
इलेक्टोरल बाँड्सचे सर्वात मोठे खरेदीदार फ्यूचर गेमिंगचे सँटियागो मार्टिन
मुंबई: १९ वर्षीय नोकराने आपल्या मालकिणीचा गळा घोटला!
लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर!
तिकीट नाकारल्याने तृणमूलच्या नेत्यांनी ममतांचे फोटो उतरवले, मोदींचे फोटो लावले!
दरम्यान, शत्रूच्या ड्रोनला लक्ष्य करण्यासाठी भारतीय लष्कर प्रशिक्षित पतंग उडवणाऱ्यांचा वापर करत असल्याच्या बातम्या आल्या आहेत. २०२१ पासून भारत-पाकिस्तान सीमेवर मानवरहित हवाई वाहनांकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि ड्रग्जची तस्करी करणाऱ्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सूचित केले आहे. मात्र, आता तेलंगणा पोलिसांचा हा उपक्रम कितपत प्रभावी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे .