रमजानसाठी दहावीच्या पूर्व-अंतिम परीक्षांचे वेळापत्रक बदलल्यानंतर तेलंगणातील काँग्रेस सरकारवर भारतीय जनता पक्षाचे नेता शांती कुमार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी टीका केली आहे. भाजपचे तेलंगणा राज्य कोषाध्यक्ष शांती कुमार यांनी ट्विटरवर पोस्ट केले आणि राज्य सरकारचे परिपत्रक शेअर केले आहे, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की “रमजानच्या पार्श्वभूमीवर” प्री-फायनल परीक्षेच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
शांती कुमार म्हणाले, “काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो सर्वांचा पक्ष नाही तर मुस्लिमांचा पक्ष आहे. रमजानसाठी तेलंगणात दहावीच्या पूर्व-अंतिम परीक्षेच्या वेळेत बदल करणे ही निष्पक्षतेच्या तोंडावर एक जोरदार चापट मारण्यासारखे आहे. ते कधी हिंदू सणांची अशीच काळजी घेतील का? असा सवाल उपस्थित करत याचा विरोध केला पाहिजे, असे कुमार म्हणाले.
हे ही वाचा :
रेल्वे ट्रॅकवर लोखंडी बोल्ट आणि दगड ठेवणाऱ्या इबादुल्ला आणि अन्वरुलला अटक!
‘संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार झाली!’…रोहित पवारांनी केला दावा
ट्रम्पसोबत बाचाबाचीनंतर ब्रिटनमध्ये झेलेन्स्कींच्या गळाभेटी!
एसएफआयच्या आंदोलनात मंत्री बसू जखमी
केंद्रीय गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी हा निर्णय अन्याय असल्याचे म्हटले आणि प्रश्न उपस्थित केला की रमजानमुळे हा बदल करण्यात आला आहे का? आणि त्याचा फटका इतर समुदायाच्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागेल का?. ते पुढे म्हणाले, “मी सरकारकडे मागणी करतो की त्यांनी त्वरित परीक्षेचे वेळापत्रक सुधारावे जेणेकरून विद्यार्थी आणि शिक्षकांना कोणतीही गैरसोय होऊ नये.”
ते पुढे म्हणाले, सरकार अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या तबलिगी जमातसारख्या संघटनांवर करदात्यांचे पैसे खर्च करत आहे. सरकार रमजानसाठी कर सवलती, बक्षिसे आणि मोफत निवास आणि प्रवास देखील देत आहेत. पण जेव्हा हिंदू भक्तांचा विषय येतो, मग ते अय्यप्पा, भवानी किंवा हनुमान भक्त असोत – तेव्हा अशी कोणतीही सूट दिली जात नाही. काँग्रेसच्या या वृत्तीला अत्यंत आक्षेपार्ह म्हणत त्यांनी तेलंगणा सरकारने हे परिपत्रक तात्काळ मागे घेण्याची विनंती त्यांनी केली.
Congress has once again proved it’s not a party for all but a party for Muslims.
Changing 10th class pre-final exam timings in Telangana, for Ramzan is a clear slap on the face of fairness. Will they ever care about Hindu festivals the same way?
This blatant appeasement must… pic.twitter.com/ZkqOCmc7xt
— Shanthi Kumar (@BJPShanthikumar) March 2, 2025