26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषतेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले, ‘तेलंगणात गुजरात मॉडेल राबवणार’

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले, ‘तेलंगणात गुजरात मॉडेल राबवणार’

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे स्पष्टीकरण

Google News Follow

Related

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याला मोठ्या बंधूप्रमाणे आहेत आणि तेलंगणाला जर विकास साधायचा असेल तर राज्याने गुजरात मॉडेलचा आदर्श बाळगला पाहिजे’, असे प्रतिपादन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केले. ‘आपण केंद्र सरकारविरोधात लढणार नाही. कारण तेलंगणाचा विकास करण्यासाठी आम्हाला पंतप्रधान मोदी यांच्या साह्याची गरज आहे,’ असे प्रतिपादनही त्यांनी केले.

‘पंतप्रधान मोदी यांनी पाहिलेले पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तेलंगणा हात पुढे करण्यास तयार आहे,’ असेही रेड्डी म्हणाले. हैदराबाद आणि तेलंगणा केंद्राला देशाच्या विकासासाठी मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राकडे निधी मागितला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हे तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी सोमवारी तेलंगणाच्या अदिलाबाद येथे ५६ हजारांहून अधिक किमतीच्या ३० विकासकामांचे भूमिपूजन केले.

हे ही वाचा:

केंद्रात काँग्रेसची सत्ता येऊ दे मग मोदींना मारू; पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

परिवारवादी लोक काळा पैसा लपवण्यासाठी भारताबाहेर बँक खाती उघडतात

रणजी ट्रॉफी: मुंबईची तामिळनाडू संघावर मात, फायनलमध्ये धडक!

तृणमूल काँग्रेस आमदाराने राम मंदिराबद्दल ओकली गरळ; अपवित्र स्थान म्हणत हिणवले

‘देशातील १४० कोटी जनता माझे कुटुंब आहे. देशाचा विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. म्हणूनच तेलंगणाही अबकी बार, ४०० पार असे म्हणत आहे,’ असे मोदी भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेला संबोधित करताना म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा