उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्याची सध्या तयारी जोरदार सुरु आहे. देशाचे नाहीतर संपूर्ण जगाचे या लग्न सोहळ्याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यापूर्वी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड, सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी सहभाग नोंदवत डान्स सादर केला. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरेसुद्धा गाण्याच्या तालावर नाचताना दिसले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे एरवी अदानी अंबानी यांच्यावर टीका करतात, पण या कार्यक्रमासाठी मात्र आवर्जून उपस्थित राहतात. मध्यंतरी अंबानी यांनी क्रूझवर आयोजित केलेल्या कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर विरोधकांकडून टीका होत आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील अंबानींच्या सोहळ्याला ठाकरे कुटुंबांच्या उपस्थितीवरून टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले की, एकाचा नातू अदानी यांच्या गाडीचा ड्राइव्हर बनतो तर दुसऱ्यांचा नातू अंबानींच्या लग्न सोहळ्यात नाचतो. त्यानंतर महाराष्ट्रासमोर येऊन यांनी गुजराती समाजाला शिव्या घालायच्या. अदानी-अंबानी कुटुंबांच्या सोहळ्यात तुम्ही सहभागी राहता आणि नंतर कुठल्या तोंडाने शिव्या घालता. त्यामुळे यांनी दुटप्पीपणा बंद केला पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले.
हे ही वाचा:
शरद पवार म्हणतात, शेतकऱ्यांना वीज मोफत कशाला?
‘काश्मीर टायगर्सने’ घेतली कठुआ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी !
भुलवून रशियन सैन्यात भरती केलेल्या भारतीयांची होणार सुटका
कठुआमधील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून; स्थानिकांनी मदत केल्याची माहिती
ठाकरे यांच्याप्रमाणेच इंडी आघाडी, महाविकास आघाडी यांनी सातत्याने अदानी अंबानी यांना लक्ष्य केले आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर प्रहार करताना त्यांनी सातत्याने या दोन उद्योगपतींना लक्ष्य केले पण तसे करत असतानाच शरद पवारांचे अदानी यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध लपलेले नाहीत. उद्धव ठाकरेही अंबानींच्या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होत असल्याचे दिसते. त्यातून लोक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यापूर्वीचे विधी त्यांच्या मुंबईतील घरी पार पडत आहेत. काही दिवसांपूर्वी बी. के .सी इथल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर इथं संगीतसोहळा पार पडला. या संगीत सोहळ्यात रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी उपस्थिती लागली. यावेळी सेलिब्रिटींसोबत तेजस ठाकरेंनी स्टेजवर डान्स केला. तेजस ठाकरेंच्या डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.