राजस्थानमध्ये तेजस विमान कोसळले

विमानाचे पायलट्स सुखरूप

राजस्थानमध्ये तेजस विमान कोसळले

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वदेशी बनावटीचे तेजस फायटर विमान राजस्थानमध्ये कोसळलं. शक्ति युद्धाभ्यास सुरू असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या विमानाचे पायलट्स सुखरूप असून विमानाचे मात्र नुकसान झाले आहे.

मंगळवार, १२ मार्च रोजी दुपारी राजस्थानच्या जैसलमेरमध्ये ही दुर्घटना घडली. जवाहर कॉलोनीजवळ हा अपघात झाला. दुपारी २ वाजताच्या सुमारास तेजस विमान हॉस्टेलच्या छतावर कोसळलं. तेजस विमान कोसळताच लगेच आगीच्या ज्वाळा भडकल्या. सुदैवाने दोन्ही वैमानिकांनी विमानातून उड्या टाकून आपले प्राण वाचवले. या अपघाताच्या चौकशीसाठी कोर्ट ऑफ इंक्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा..

काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीपासून काढला पळ?

जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; आमदार प्रतिभा धानोरकरांचा गौप्यस्फोट

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा राजीनामा!

भारतीय हवाई दलाने या घटनेबद्दल माहिती दिली आहे. राजस्थान जैसलमेर येथे सध्या भारताचा शक्ती युद्ध अभ्यास सुरू आहे. यावेळी तेजस विमान शहरापासून २ किलोमीटर दूर भील समाजाच्या हॉस्टेलवर जाऊन कोसळलं. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी हॉस्टेल रिकामी होतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पोखरणमध्ये सुरु असलेल्या युद्ध अभ्यासाच्या स्थळापासून १०० किमी दूर ही घटना घडली.

Exit mobile version