बेंगळुरूमध्ये नुकतेच आत्महत्या करणाऱ्या एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या पत्नीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी निकिता सिंघानियाला हरियाणातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. तर निकिताची आई निशा सिंघानिया आणि भाऊ अनुराग सिंघानिया यांना प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेतल्यानंतर बेंगळुरू पोलिसांनी ही अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.
बेंगळुरूमध्ये अभियंता म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाषने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीवर छळ केल्याचा आरोप केला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अतुलची पत्नी निकिता सिंघानियाला हरियाणातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली होती आणि त्याची आई निशा आणि भाऊ अनुराग यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथून अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची पुष्टी अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने केली. अतुलवरील खटला मागे घेण्यासाठी ३ कोटी रुपये आणि मुलाला भेटण्याच्या हक्कासाठी ३० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
अतुल सुभाष सोमवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर त्याचा भाऊ विकास कुमार याने सुभाषची पत्नी निकिता, त्याची आई निशा, भाऊ अनुराग आणि काका सुशील सिंघानिया यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी आता अतुलची पत्नी आणि तिची आई, भावाला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
मतलबी वारे सुस्साट… काँग्रेस फुटणार, मविआ बुडणार?
स्वार्थी घटनादुरुस्तीचे रक्त काँग्रेसच्या तोंडाला लागले, त्याची पुनरावृत्ती गांधी परिवाराने केली!
अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबरला होणार उच्चस्तरीय सुरक्षा बैठक
अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना धुतले
दरम्यान, बेंगळुरू येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अतुल सुभाषने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांकडून छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली होती. त्याने २४ पानी सूसाईड नोट मागे सोडली, ज्यामध्ये वैवाहिक समस्यांमुळे होणारा त्रास आणि पत्नीने दाखल केलेल्या अनेक केसेसची माहिती दिली होती.