एचबीओच्या ‘हाऊस ऑफ ड्रॅगन्स’ या बहुचर्चित सीरिजचे टीजर ट्रेलर काल प्रदर्शित झाले आहे. युट्युब वर हे टीजर ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. जगभरातील प्रेक्षक या टीजर ट्रेलरची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. त्यामुळे हे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या काही तासात ७० लाखांच्या आसपास लोकांनी हे ट्रेलर पाहिले आहे. एचबीओ वाहिनीवर येऊ घातलेली ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ ही सिरीज म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या प्रसिद्ध सिरीजचा प्रिक्वल म्हणजेच आधीचा भाग आहे.
गेम ऑफ थ्रोन्स ही एचबीओ वाहिनीवरील सिरीज आजवरच्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या सिरीजपैकी एक आहे. जॉर्ज आर.आर मार्टिन या इंग्रजी लेखकाच्या कादंबऱ्यांवर बितली आहे. २०११ ते २०१९ या नऊ वर्षात या वेब सिरीजचे एकूण ८ सिजन प्रेक्षकांच्या भेटीला आले. या पैकी शेवटच्या सिजनचा अपवाद वगळता बाकी सर्व सिजन प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरले.
हे ही वाचा:
‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’
कचरावेचक झाले गायब आणि कचरा दिसू लागला
बॅगच्या पटट्याने केली एसटी चालकाने आत्महत्या
एलआयसी आयपीओमध्ये २०% एफडीआयला संमती?
सत्तेसाठी चालणाऱ्या या खेळात वेगवेगळे जी घराणी दाखवण्यात आली आहे त्यापैकी टार्गेरीयन या घराण्यावर हाऊस ऑफ द ड्रॅगन ही मालिका बेतली आहे. टार्गेरीयन घराणे हे ड्रॅगन प्राण्याला पाळणारे घराणे दाखवण्यात आले आहे. म्हणूनच या सिरीजला ‘हाऊस ऑफ द ड्रॅगन’ अर्थात ड्रॅगनचे घराणे असे म्हटले गेले आहे.