सरन्यायाधीश चंद्रचुड निवृत्त, म्हणाले कोणाला दुखावले असेल तर माफ करा!

न्यायमूर्ती संजीव खन्ना येणार पुढील सरन्यायाधीश

सरन्यायाधीश चंद्रचुड निवृत्त, म्हणाले कोणाला दुखावले असेल तर माफ करा!

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांचा आज (८ नोव्हेंबर) कामकाजाचा शेवटचा दिवस होता. सरन्यायाधीशांनी आपल्या निरोपाच्या भाषणात आपल्या न्यायिक प्रवासावर भाष्य करत कामकाजातून आलेला अनुभव सांगितला. तसेच सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश, वकील आणि इतर कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. मी चुकूनही कोणाला दुखावले असेल किंवा कोणाला दुःखी केले असेल मला माफ करा, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. निरोप समारंभात जेष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी भाषण केले.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, आपण सगळे इथे प्रवाशासारखे आहोत, जे काही काळ येतात, आपलं काम करतात आणि मग जातात. न्यायालयाच्या रूपाने ही संस्था नेहमीच चालू राहील आणि विविध विचारांचे लोक तिच्याकडे येतच राहतील. मी हे न्यायालय सोडल्यावर काही फरक पडणार नाही कारण न्यायमूर्ती खन्ना यांच्यासारख्या स्थिर व्यक्तीने पदभार स्वीकारला आहे आणि ते खूप प्रतिष्ठित असल्याचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

१८० हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सुरू आहे मुस्लीम मतदारांची नोंदणी

ब्रिटिशांनी जे षडयंत्र रचले नाही, ते राहुल गांधींनी रचले!

काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात लावलंय

पुतीन म्हणतात, जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र

न्यायाच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले, आतापर्यंत हाताळलेल्या प्रकरणांमधून देखील शिकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अनावधानाने दुखावल्याबद्दल क्षमा मागितली. ते म्हणाले, “जर मी तुमच्यापैकी कोणाला दुखावले असेल, त्याबद्दल मला माफ करा. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंह यांनी सरन्यायाधीशांसोबत काम  करतानाच्या आठवणी सांगितल्या तेव्हा सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना हसू आणि अश्रू अनावर झाले.

दरम्यान, ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरु झालेला सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ आज संपला. सरन्यायाधीशांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोठे ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. राम मंदिर, निवडणूक रोखे, समलैंगिक विवाह, कलम-३७० असे अनेक निर्णय त्यांनी दिले. दरम्यान, सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निवृत्तीनंतर पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१ वे सरन्यायाधीश असणार आहेत.

Exit mobile version