भारतीय क्रिकेट संघाचे २०२४ वर्षाचे वेळापत्रकही अगदी व्यग्र असणार आहे. यंदाच्या वर्षी भारताचा क्रिकेट संघ १५ कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ एकूण १८ टी-२० सामने खेळेल. (अंतिम सामन्यापर्यंत भारत पोहोचल्यास). तर, एकदिवसीय सामने केवळ तीनच होतील.
भारतीय संघाला सन २०२४च्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच मातीत पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यातील शेवटचा सामना ३ जानेवारी २०२५ रोजी खेळला जाईल. अशा तऱ्हेने भारतीय संघ एकूण १५ कसोटी सामने खेळणार आहे. त्यात इंग्लंडविरोधात पाच कसोटी, बांग्लादेशविरोधात दोन आणि न्यूझीलंडविरोधात तीन कसोटी सामने खेळणार आहे.
जूनमध्ये टी २० विश्वचषक
२०२४मध्ये भारतीय संघ केवळ तीन एकदिवसीय सामने खेळेल. ही मालिका श्रीलंकेच्या विरोधात जुलैमध्ये त्यांच्याच देशात होईल. तर, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेशच्या विरुद्ध तीन-तीन टी-२० सामन्यांची मालिकाही खेळली जाईल. या दरम्यान भारताला जूनमध्ये होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धाही जिंकायची आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने धडक दिली तर भारत एकूण नऊ सामने खेळेल. अशाप्रकारे भारतीय क्रिकेट संघ एकूण १८ टी-२० सामने खेळेल.
हे ही वाचा:
निमंत्रण फक्त रामभक्तांना, मुख्य मंदिर पुजाऱ्यांकडून उद्धव आणि राऊतांची खरडपट्टी!
भारतासोबतचे संबंध बिघडत असताना, मालदीवचे राष्ट्रपती चीनला भेट देण्याची शक्यता!
बिहारमध्ये एका रात्रीत तलाव चोरीला
अयोध्येत भव्य राम मंदिर ते लोकसभा निवडणुका…
भारतीय संघाचे वेळापत्रक
३ ते ७ जानेवारी – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा सामना, केपटाऊन
११ ते १७ जानेवारी – विरुद्ध अफगाणिस्तान. तीन सामन्यांची टी२० मालिका (भारत)
२५ जानेवारी ते ११ मार्च – विरुद्ध इंग्लंड, पाच कसोटी सामन्यांची मालिका (भारत)
मार्च ते मेअखेर – आयपीएल
४ जून ते ३० जून (आयसीसी टी २० वर्ल्ड कप, अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्त यजमानपद)
जुलै – विरुद्ध श्रीलंका. तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने
सप्टेंबर – विरुद्ध बांग्लादेश. दोन कसोटी आणि तीन टी २० (भारत)
ऑक्टोबर – विरुद्ध न्यूझीलंड, तीन कसोटी (भारत)
नोव्हेंबर आणि डिसेंबर – विरुद्ध ऑस्ट्रेलिया. पाच कसोट्यांची मालिका