रांचीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

भारतीय फिरकीपटूंनी इंग्रजांना तालावर नाचवले

रांचीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

टीम इंडियाच्या फिरकीपुढे इंग्लंड फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर उभी आहे. पहिल्या डावातील आघाडीनंतर दुसऱ्या डावात इंग्लंड बॅकफूटवर गेलेला आहे. रांची कसोटीचा तिसरा दिवसाचा खेळ संपला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एकही विकेट न गमावता ४० धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा २४ धावांवर तर यशस्वी जयस्वालने १६ धावा केल्या. हा सामना जिंकायला आणि कसोटी मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघाला विजयासाठी अजून १५२ धावांची आवश्यकता आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघ अतिशय मजबूत स्थितीत दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रांची कसोटी जिंकून मालिका विजय मिळवण्यासाठी उत्सुक आहे. सध्या भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ तिसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पण तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांविरुद्ध ज्या प्रकारे धावा केल्या हे पाहता इंग्लंडला ते जड जाणार आहे. त्यामुळे बेन स्टोक्सच्या संघाला भारतीय फलंदाजांना रोखणे सोपे जाणार नाही.

हेही वाचा :

सुलतानने राज नाव धारण करत हिंदू मुलीला फसवले!

उत्तर प्रदेश: फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू!

दोन हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा मास्टरमाइंड तामिळ चित्रपट निर्माता

सागर बंगल्यापर्यंत पोहचण्याअगोदर आमची भिंत पार करा!

इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला
तत्पूर्वी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर आटोपला. इंग्लंडकडे पहिल्या डावात ४६ धावांची आघाडी होती. त्यामुळे भारतीय संघासमोर १९२ धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून अश्विन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अश्विनने इंग्लंडच्या ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजाने १ विकेट घेतली.

इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या होत्या. जो रूटने १२२ धावांची शतकी खेळी केली. रॉबिन्सनने ५८ धावांचे केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. आकाश दीपला घेतल्या. मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या २ फलंदाजांना आपला शिकार बनवले. अश्विनने १ विकेट घेतली. इंग्लंडच्या ३५३ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३०७ धावा केल्या. याशिवाय यशस्वी जयस्वालने ७३ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून शोएब बशीरने सर्वाधिक ५ बळी घेतले. टॉम हॉर्टलीला २ यश मिळाले. जिमी अँडरसनने २ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

Exit mobile version