ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने मोठ्या दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर आयसीसी टुर्नामेंटचे किताब मिळवण्यासाठी टीम इंडिया आता उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. सेमीफायनलमध्ये भारतीय संघ इंग्लंशी दोन हात करणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रवीड, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वेगवान गोलंदाजांसाठी बिझनेस क्लासच्या विमानाच्या सीट्स सोडलेल्या आहेत. मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांना सामन्यात ताजेतवाने रहावे, आपले पाय पसरून आराम मिळू शकेल या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. विश्वचषकात भारताचे वेळापत्रक इतके व्यस्त आहे की प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या झालेल्या पहिल्या सामन्यात थरारक विजय मिळवूनही आनंद साजरा करता आलेला नाही.
विमानात आराम मिळण्यासाठी
आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक संघाला चार बिझनेस-क्लास जागा मिळतात. बहुतेक संघ या जागा प्रशिक्षक, कर्णधार, उपकर्णधार आणि व्यवस्थापक यांना देतात. ऑस्ट्रेलिया देश मोठा असल्याने टीम इंडियाला दर तिसऱ्या व चौथ्या दिवशी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विमानातील बिझनेस क्लासच्या चार जागा वेगवान गोलंदाजांना दिल्या गेल्या. ऑस्ट्रेलियात कधी उष्ण वारे वाहतात, कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी होते. या बदलत्या चक्रात खेळाडू आजारी पडण्याचा धोका बळावतो.
हे ही वाचा:
सत्तारांचे समर्थन नाही, पण महाराष्ट्रात सिलेक्टिव्हपणा केला जातो
नीलमताई गॅरेण्टी उद्धव ठाकरे यांची तरी आहे का?
सुधा मूर्ती संभाजी भिडेंना भेटल्या आणि…
चार वर्षात दाऊदने भारतात पाठवले १३ करोड
भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत तेजतर्रार कामगिरी केलेली आहे. अर्शदीप सिंगने प्रतिस्पर्धी संघाचे कंबरठे मोडून आतापर्यंत या वर्ल्डकपमध्ये १० विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या, मोहम्मद शमीने मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवून वाहवा मिळवली आहे. भुवनेश्वर कुमारने आपल्या स्वींग गोलंदाजीने नाचायला लावलेय. भारतीय संघ गुरुवारी सेमीफायनलमध्ये इंग्लंविरुद्ध खेळेल. क्रिकेट चाहत्यांना आशा आहे की आपले वेगवान गोलंदाज कमालीचा खेळ करून भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचवतील. आतापर्यंत झालेल्या २२ सामन्यात टीम इंडियाने १२ सामन्यात इंग्लंडला पाणी पाजलेय, तर इंग्लंडने १० सामन्यात भारताविरुद्ध विजय मिळवलेला आहे.