क्रिकेटप्रेंमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी धूळ चारल्यानंतर टीम इंडियाला एक गूड न्यूज मिळालीय. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाने आता कसोटी क्रमवारीतही पहिले स्थान पटकावले आहे. ताज्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया ११५ गुणांसह पहिल्या स्थानावर आरूढ झाली आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ १११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. आता भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीत नंबर १ संघ बनला आहे.
भारतीय संघाने इतिहास घडवलाय. कारण टीम इंडिया सध्या टी-२०, वनडे आणि टेस्ट या तिन्ही फॉरमॅटच्या रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा भारत हा आशियातील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघानेही ही कामगिरी केली आहे. २०२३ वर्ष टीम इंडियासाठी लकी ठरलेय, भारताने या वर्षात आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही.
हेही वाचा :
खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा
श्रद्धा, निकिता आणि आता पालघरमध्येही .. हत्या करून मृतदेह लपवला पलंगाखाली
बोगस लिपिक भरती.. धनंजय मुंडे यांच्या नावे मंत्रालयात घोटाळा
तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच अव्वल
आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी, वनडे आणि टी-२० क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. कसोटीत ऑस्ट्रेलिया ११५ गुणांसह पहिल्या, ऑस्ट्रेलिया १ गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंड १०६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंड १०० गुणांसह चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका ८५ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
वनडेतही नंबर वन
वनडेमध्येही भारतीय संघ आघाडीवर आहे. टीम इंडिया ११४ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया ११२ गुणांसह दुसऱ्या आणि न्यूझीलंड आणि इंग्लंड १११-१११ गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
टी-२० चा दबदबा कायम
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांप्रमाणेच टी-२०मध्येही भारतीय संघाचा दबदबा कायम आहे. टीम इंडिया २६७ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंड २६६ रेटिंगसह आणि पाकिस्तान २५८ रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड अनुक्रमे २५६ आणि २५२ रेटिंगसह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.