मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जाणार आहे अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचे भारताचे लक्ष्य असेल. तर मालिकेत बरोबरी साधण्यासाठी वेस्ट इंडीज संघ प्रयत्नशील असेल आणि त्याच हेतूने मैदानात उतरेल.

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्या दरम्यान तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका सध्या सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यावर भारताने आपले नाव कोरले असून सहा विकेट्स राखून वेस्ट इंडीज संघावर मात केली. या विजयासह भारताने मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली आहे. ही आघाडी वाढवण्याच्या दृष्टीने रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आज मैदानात उतरेल.

हे ही वाचा:

‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’

संजय राऊतांचे ‘ते’ पत्र पाहून त्यांची कीव वाटते

ईडीच्या भीतीने संजय राऊतांची आगपाखड

कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला

पण कायरन पोलार्ड नेतृत्वातील वेस्ट इंडिजचा संघ हा देखील कमजोर संघ नसून मालिकेत परतण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करतील. आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी वेस्ट इंडिजचा संघ खेळताना दिसेल. तसे झाले तर ११ फेब्रुवारी रोजी होणारा तिसरा आणि अखेरचा सामना हा मालिकेतील निर्णायक सामना ठरेल.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाचे शिखर धवन, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी हे खेळाडू उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे आजच्या भारतीय संघ नेमकी कोणाला संधी देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. आज दुपारी १.३० वाजता या सामन्याला सुरवात होईल. तर १ वाजता नाणेफेक होईल. नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

Exit mobile version