शिक्षक भरतीला ओहोटी लागली त्याचे काय?

शिक्षक भरतीला ओहोटी लागली त्याचे काय?

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येमुळे अवघा महाराष्ट्र हेलावला. आत्महत्या केल्यानंतर ठाकरे सरकारने आता या एमपीएससी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळेच आता आत्महत्या हाच मार्ग आहे का असा सवाल भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. स्वप्निलच्या आत्महत्येनंतर अवघ्या महाराष्ट्रात एमपीएससी भरतीविषयी पडसाद उमटले. त्यामुळेच आता स्वप्निलच्या आत्महत्येनंतर शिक्षक आणि प्राध्यापक भरती या विषयालाही तोंड फुटले आहे.

२०१९ पासून राज्यात सुरू झालेली शिक्षक भरती निधी अभावी अजूनही पूर्ण झालेली नाही. स्वप्नील लोणकरसारखी एखाद्या उमेदवाराने आत्महत्या केली तरच ही भरती होईल कायस असा उद्विग्न सवाल इच्छुक व पात्र उमेदवार करतायत, असे आमदार भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारले आहे.

राज्यामध्ये दोन वर्षांपासून शिक्षक भरती झाली नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. २०१९ पासून १२ हजार पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया खोळबंलेली आहे. महाविद्यालयांसहीत विद्यापीठांमध्येही भरती अजूनही झालेली नाही. त्यामुळेच आता शिक्षक आणि प्राध्यापक होण्यासाठी पुढे येणारे उद्विग्न झाले आहेत. आंदोलने करूनही काहीच घडत नसल्याने उमेदवारांमध्ये आता नैराश्याचे वातावरण आहे. नाराजी संतापाशिवाय उमेदवार काही करू शकत नाही, म्हणून हतबल झाले आहेत.

शिक्षक भरतीची प्रक्रिया विविध तांत्रिक कारणांमुळे अडकली गेली आहे. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर एमपीएससीच्या भरतीचा विषय सरकारला गांभीर्याने घ्यावा लागला. त्यामुळेच आता प्रलंबित शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठी शिक्षक उमेदवारांचा बळी जायला हवा आहे, असा प्रश्न डी.टी.एड.-बी.एड. स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी उपस्थित केला.

सद्यस्थितीमध्ये राज्यातील प्राध्यापकांच्या १५ हजार जागा रिक्त आहेत. असे असूनही राज्यशासनातर्फे केवळ ४० टक्के भरती करण्यात आलेली आहे. त्यामुळे उरलेल्या पदांचे काय हा प्रश्न कायम आहेच. त्यामुळेच आता आत्महत्या करायची का म्हणजे भरती होईल असा सूर या उमेदवारांकडून आळवला जात आहे. राज्याकडे निधी नाही असे ठाकरे सरकार कारण देते. मग पब्लिसिटीवर ठाकरे सरकार एकीकडे वारेमाप उधळपट्टी करत आहे. त्यामुळेच आता सर्वसामान्यांच्या लक्षात आता ठाकरे सरकारची दुटप्पी भूमिका लक्षात येऊ लागलेली आहे.

Exit mobile version