शिक्षिकांचे विद्यार्थ्यांना आदेश…आमचे रिल्स लाइक करा, शेअर करा!

उत्तर प्रदेशच्या शाळेतील घटना, विद्यार्थी, पालकांनी केली तक्रार

शिक्षिकांचे विद्यार्थ्यांना आदेश…आमचे रिल्स लाइक करा, शेअर करा!

सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे अनेक जण आपापल्या पद्धतीने या सोशल मीडियाचा उपयोग करून घेत असतात. उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यातील एका शाळेत चक्क शिक्षिकांनी आपल्या स्वतःच्या पोस्ट शेअर आणि लाइक करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्ती केली तसेच त्यांचे सोशल अकाऊंट सबस्क्राइब करण्यासाठीही त्यांना सांगितल्याची घटना घडली आहे.

 

 

इन्स्टाग्रामवर या शिक्षिका आपल्या पोस्ट शेअर करतात. या शिक्षिकांपैकी एक बाकीच्यांचे चित्रिकरण करून नंतर ते अपलोड करतात. विशेष म्हणजे शाळेत असताना या शिक्षिका सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. रवीपूजा नावाने हे अकाऊंट आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

 

 

केवळ विद्यार्थीच नव्हेत तर विद्यार्थ्यांच्या पालकांनाही लाइक, शेअर आणि सबस्क्राइब करण्यासाठी सक्ती केली जाते. यामुळे पालकांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि कारवाईची मागणी केली. आता तेथील शिक्षणाधिकारी यासंदर्भात चौकशी करत आहेत.

हे ही वाचा:

लालबागच्या राजाला नवस करू दिला नाही, म्हणून तिने केले मुलाचे अपहरण

‘जय श्री राम’चा नारा देण्यास नकार देणाऱ्या तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघांना अटक

इम्रान खानचे वकील आणि पीएमएल-एन सिनेटर यांच्यात टीव्ही शोमध्ये ठोसेबाजी

कॉफी मेकरमध्ये लपवले होते २ कोटींचे सोने!

 

 

 

एका मुलाने यासंदर्भात सांगितले की, या शिक्षिका शाळेतच रील्स रेकॉर्ड करतात आणि विद्यार्थ्यांना लाइक आणि शेअर करण्यास सांगतात. जर आम्ही तसे केले नाही तर आम्हाला मारण्याची धमकीही दिली जाते. एका विद्यार्थीनीने तर सांगितले की, या शिक्षिका आम्हाला ताटे धुण्यास आणि जेवण बनविण्यास तसेच त्यांच्यासाठी चहा बनवण्यासही सांगतात.

 

 

 

अंबिका गोयल, पूनम सिंग, नीतू कश्यप अशी या शिक्षिकांची नावे आहेत. या शिक्षिकांना यासंदर्भात विचारण्यात आले तेव्हा आम्ही शाळेत हे व्हीडिओ करत नाही आणि विद्यार्थ्यांना आम्ही चांगले शिक्षण देतो, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, या रील्ससंदर्भात आम्हाला माहीत नाही. आम्ही शाळेच्या वेळेत मुलांना शिकवतो. केवळ मुलांना शिकविण्यासाठी आम्ही काही व्हीडिओ शाळेच्या वेळेत बनवतो.

Exit mobile version