26 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषविद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षिकेनेच घातला गणवेशात

विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी शिक्षिकेनेच घातला गणवेशात

आपण एक संघ आहोत, एक टीम आहोत, म्हणून एकच गणवेश

Google News Follow

Related

मुलांना शिस्तीचे धडे देण्यासाठी छत्तीसगढमधील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षका जान्हवी याडू या स्वत: आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांच्या गणवेशात शाळेत येतात. या त्यांच्या अनोख्या उपक्रमाचे सगळ्यांकडून कौतुक होत आहे. शिक्षकही आपल्यापैकीच एक आहेत आणि आपणही आपले ध्येय गाठू शकतो, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी आपण हे पाऊल उचलल्याचे या ३० वर्षीय शिक्षिका सांगतात.

जान्हवी याडू यांनी फेब्रुवारी २०२२मध्ये या शाळेत शिकवण्यास सुरुवात केली. त्या पहिल्या ते पाचवीच्या ३५० विद्यार्थ्यांना शिकवतात. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या नेहमीच वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवतात. ‘या शाळेचे विद्यार्थी याआधी कोणत्याही कपड्यांत शाळेत येत होती. गणवेशात कोणीच येत नव्हते. त्यांच्यात शिस्तीचा अभाव होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सर्वांत प्रथम शिस्तीचे धडे देण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना एक ओळख दिली पाहिजे, हे माझ्या मनाने ठरवले. त्यांच्यात एकजुटीची भावना निर्माण होणे आवश्यक होते,’ असे जान्हवी सांगतात.

हे ही वाचा:

चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा

सोशल मीडियात हार्दिक पंड्यावर का होतोय हल्ला?

“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही

लहान मुले ही निरीक्षण, श्रवणातून आणि अनुभवातून शिकत असल्याने त्यांनी स्वत: शाळेत गणवेशात येण्याचे ठरवले. त्यामुळे त्या प्रत्येक शनिवारी गणवेशात शाळेत येऊ लागल्या. ‘माझे विद्यार्थी जेव्हा मला विचारू लागले की, तुम्ही गणवेशात का येता? तेव्हा मी त्यांना सांगितले की, आपण एक संघ आहोत, एक टीम आहोत आणि एक संघ आपली ताकद दाखवण्यासाठी एकाच रंगाचे कपडे परिधान करतो,’ असे त्या म्हणाल्या. त्यांच्या सासरच्या मंडळींनी सुरुवातीला याबाबत नाराजी दर्शवली होती. आता मात्र त्यांचाही पाठिंबा जान्हवी यांना मिळतो आहे.

‘मी गणवेश परिधान करण्यास सुरुवात केल्यामुळे माझे विद्यार्थी अधिक मोकळेपणाने त्यांचे विचार आणि त्यांच्या कल्पना माझ्यासमोर मांडू शकली. ती अधिक मोकळी झाली. हा गणवेशच एकता आणि मैत्रीचे प्रतीक झाला,’ असे जान्हवी सांगतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा