दादर हे मुंबईतील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी एक आहे. तेथून वाहतुकीचे दोन पर्याय उपलब्ध आहेत – एक बस आणि दुसरा टॅक्सी. परंतु बऱ्याच काळापासून या दोन घटकांमध्ये ३६ चा आकडा निर्माण झाला आहे.
या टॅक्सी चालकांमुळे बेस्ट सेवेसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. सगळे टॅक्सी चालक वेगवेगळ्या प्रयासांनी बस सेवा मध्ये अडथळा निर्माण करत आहेत. कधी जाणून बुजून टॅक्सी बस समोर उभी करणे किंवा बसला अडवणे या गोष्टीं पर्यंत टॅक्सी चालकांची मजल झालेली आहे. प्रवाशी देखील या समस्यांशी त्रस्त आहेत. ‘वाहतूक विभाग या टॅक्सी चालकांवर कधी कारवाही करतील?’ असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे.
हे ही वाचा:
१ लाख बँकेतून गायब झाले आणि पोलिसांनी लगेच ते मिळविलेही!
पश्चिम रेल्वेच्या सेवेत ‘यात्री ॲप’
महिला क्रिकेट सामन्यांत प्रेक्षकांनीच केला विक्रम
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ महत्त्वाचे निर्णय झाले
दादर स्थानकाबाहेर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. म्हणूनच दादरवरून वरळीला आणि प्रभादेवीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी बेस्ट ने त्यांची बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. हे टॅक्सीचालक कुठेही आणि कशीही टॅक्सी उभी करत असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. पहाटे पासून दिवस मावळण्यापर्यंत ही वर्दळ सुरूच असते. पादचाऱ्यांना वाट काढणे अवघड होते आहे. या शेअर टॅक्सींचा मार्ग शंकर रोड, एम के बोले रोड आणि बाबुराव परुळेकर रोड असा आहे. परंतु कमी वेळेत जास्त फेऱ्या मारण्याकरिता चालक गाड्या अरुंद रस्ता असलेल्या गल्लीतून टॅक्सी हाकतात. त्या मुळे प्रवासांना तथा रहिवाशींना खूप त्रास होत आहे. “टॅक्सीसाठी फक्त बाबुराव मार्ग आणि शंकर रोडचा वापर करावा. येणेकरून प्रवासांना आणि रहिवासींना त्रास होणार नाही”, असे स्थानिक ऱहिवाशांचे म्हणणे आहे.