किनारपट्टीवरील राज्ये सज्ज
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्याचे रूपांतर आता ताऊ तरी या चक्रीवादळात झाले आहे. या वादळाचा प्रभाव आज सकाळपासूनच संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने येत्या २४ तासात हे वादळ अधिक सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हे वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणार नाही. हे वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून उत्तरेला गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
अजून चार राफेल भारतात दाखल होणार
सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांचा माफीनामा
पब्लिक सब जानती है…देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र
कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीचा फुगा फुटला
या वादळाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता केरळच्या एर्नाकुलम, त्रिशूर, इडुकी, पलक्कड या जिल्ह्यांमध्ये २० सेमी पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे या परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात देखील या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार आहे. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे.
कोकणातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच मुंबईने देखील चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतदेखील पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. कोरोनामुळे किनारे मुंबईकरांसाठी बंदच होते. त्यासोबत वांद्रे- वरळी सी- लिंक दोन दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यासोबतच संपूर्ण किनारपट्टीवर मदतकार्य आणि बचावकार्यासाठी देखील या संपूर्ण भागात तयारी झाली आहे.
संपूर्ण किनारपट्टीवरील राज्ये ताऊक्ताई चक्रीवादळाचा सामना करायला सज्ज झाली आहेत.