टाटा मोटर्स ही भारतामधील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे. टाटाने बदलत्या काळानुसार नेक्सन हे इलेक्ट्रीक वाहन देखील बाजारात आणले. मात्र टाटा आता अजून १० नव्या इलेक्ट्रीक वाहने बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
टाटा २०२५ पर्यंत १० नव्या इलेक्ट्रीक गाड्या बाजारात आणणार आहे. टाटा मोटर्सनेचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली होती. यावर्षी टाटाच्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दुप्पट होऊन २ टक्के झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. टाटाने आणलेली नेक्सन या इलेक्ट्रीक वाहनाने विक्रीचे उच्चांक गाठले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नेक्सन ही अतिशय लोकप्रिय गाडी ठरली आहे.
हे ही वाचा:
आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार
भारतात ‘सबका साथ’वर शिक्कामोर्तब
अजित दादांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत दादांचे पत्र
निर्बंध झुगारत नवी मुंबईत दुकानं उशिरा पर्यंत सुरूच
इलेक्ट्रिक वाहनांसोबतच टाटा, चार्जिंग स्टेशन्स बनवण्यावर देखील भर देत आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या बॅटरी उत्पादनासाठी टाटा युरोपात भागीदार शोधत असल्याचे देखील कळले आहे. चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, टाटा लवकरच अनेक अद्ययावत गाड्यांच्या क्षेत्रात जागाचे नेतृत्व करेल असा विश्वास त्यांना वाटत आहे. त्याबरोबरच टाटा समूह ग्राहकांच्या गरजेनुसार आणि आवडीनुसार बदल करण्याचे काम देखील मोठ्या प्रमाणात करत असल्याचे देखील कळले आहे. टाटा मोटर्सच्या मालकीच्या लॅड रोव्हरच्या सर्व गाड्या २०३६ पर्यंत इलेक्ट्रिक होतील असे देखील सांगितले गेले आहे. जग्वारच्या सर्व गाड्या २०२५ पर्यंत इलेक्ट्रिक होतील आणि २०३० पर्यंत जग्वार लँड रोव्हरच्या ६० टक्के गाड्या इलेक्ट्रिक होतील असे देखील सांगितले गेले आहे.
जगातीक पर्यावरण बदलांमुळे इलेक्ट्रीक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्याचाच फायदा घेऊन टाटा देखील पर्यावरण बचावात हातभार लावणार आहे.