टाटा ग्रुप भारतातील पहिले खाजगी कंपनीने बनवलेले लष्करी विमान बनवणार आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’ ला देखील बळ मिळेल. याचबरोबर भारताचा संरक्षण खरेदीवरील खर्चही कमी होईल.
बंगळुरू मध्ये होत असलेल्या ‘डिफेन्स एक्स्पो’ मध्ये टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड ही कंपनी आपल्या दोन इंजिन असलेल्या लष्करी विमानाची ताकद दाखवेल. अशी माहिती या कंपनीच्या प्रवक्त्यांनी एका इमेलद्वारे दिली आहे.
हे ही वाचा: एअरो इंडिया मध्ये मेड इंडियाचा बोलबाला
अशा प्रकारच्या लष्करी विमानासाठीची तांत्रिक माहिती एका जर्मन कंपनीकडून टाटाने मिळवली आहे. अशी माहिती माध्यमांमधून मिळाली आहे.
टाटाचे हे विमान भारतीय हवाईदलात सामील झाल्यावर सीमेवर पाळत ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग करता येईल. चीनशी सुरु असलेल्या विवादामध्ये डोंगराळ भागात पाहणीसाठी भारताला मोठ्या प्रमाणात विमानांची आवश्यकता आहेच.
टाटाचा हा प्रकल्प यशस्वी झाल्यास टाटा ही भारतातील पहिली खाजगी कंपनी ठरेल जी लष्करी विमान बनवू शकेल. आजवर लष्करी विमान हे केवळ सरकारी कंपनी एचएएल बनवत असे. भारताखेरीज इतर अनेक मोठे लष्करी सामर्थ्य असलेल्या देशांमध्ये खाजगी विमान कंपन्याच लष्करी विमाने बनवतात. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस सारख्या देशांचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे ‘मेक इन इंडिया’ या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला मोठे बळ मिळेल.