५जीच्या शर्यतीत आता टाटाचीही उडी

५जीच्या शर्यतीत आता टाटाचीही उडी

टाटा ग्रुप ५जीच्या जगात क्रांती घडविण्याची तयारी करीत आहे. रिलायन्स जिओने यापूर्वीच ५जी संदर्भात आपला मेगाप्लॅन जाहीर केलाय. आता टाटा समूहही या शर्यतीत सामील झाला आहे. टाटा सन्सने दूरसंचार उपकरणे बनवणाऱ्या तेजस नेटवर्कमधील नियंत्रक भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केलीय. या करारामुळे टाटा समूहाची एंट्री ५ जीमध्ये होईल आणि त्यामुळे नोकिया, एरिक्सन आणि हुआवे यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा होऊ शकेल. मुकेश अंबानी यांचीसुद्धा ५जी संदर्भात मोठी योजना आहे.

टाटा सन्स आणि तेजस नेटवर्क करारासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, टाटा सन्सचे एक युनिट पॅनाटोन फिन्वेस्ट लिमिटेड तेजस नेटवर्कमधील ४३.३५ टक्के भाग खरेदी करेल. या करारासंदर्भात तेजस नेटवर्कने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की टाटा सन्सची (टाटा समूहाची होल्डिंग फर्म) पॅनाटोन फिनव्हेस्ट या सहायक कंपनीने करार केलाय. या कराराअंतर्गत कंपनी पॅनाटोनला १.९४ कोटी इक्विटी शेअर्स प्राधान्य तत्त्वावर २५८ रुपये प्रति शेअर दराने देणार आहे, त्याची एकूण किंमत ५०० कोटी रुपये असेल.

टाटा ग्रुपची तयारी ही ५ जीच्या जगात क्रांती करण्याची आहे. विशेषतः हे काम टीसीएसच्या मदतीने केले जाणार आहे, तर तेजस नेटवर्कच्या मदतीने हार्डवेअर सपोर्ट उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात जेव्हा भारती एअरटेल आणि टाटा समूह कंपनी टीसीएस यांनी संयुक्तपणे भारतातील ५जी ​​नेटवर्किंगसाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली होती. दोन्ही कंपन्या स्वदेशी ५जी तंत्रज्ञानावर एकत्र काम करत आहेत. एअरटेल जानेवारी २०२२ पर्यंत ५जी साठी पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करण्याची तयारी करत आहे.

हे ही वाचा:

शिल्पा शेट्टीला न्यायालयाची चपराक

पीव्ही सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ करा

कृणाल पांड्यापाठोपाठ ‘या’ दोन खेळाडूंनाही कोरोना

टाटा समूह भारतात ५जीसाठी पूर्ण तयारी करीत आहे. एंटरप्राइझ विभागात स्वत: साठी असलेली संधी गमावू इच्छित नाही. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, तेजस आणि टाटा सन्सकडून पीएलआय योजनेअंतर्गत प्रोत्साहन देण्याबाबत अर्जही दाखल करण्यात आलेत. तेजस स्थापनेचा उद्देश दूरसंचार कंपन्यांना उपकरणे पुरविणे हा होता.

Exit mobile version