टाटा स्टीलचे ऑक्सिजन उत्पादन ८०० टन प्रतिदिनांवर

टाटा स्टीलचे ऑक्सिजन उत्पादन ८०० टन प्रतिदिनांवर

भारतातील कोविडचे संकट दिवसेंदिवस गहीरे होत जात आहे. प्रत्येक दिवशी लक्षावधींनी कोरोना रुग्णवाढ होत आहे. त्याबरोबरच या रुग्णांसाठी लागणाऱ्या द्रवरुप ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे. या परिस्थितीवर मदत करण्यासाठी टाटा स्टीलने त्यांचे ऑक्सिजन उत्पादन प्रतिदिन ८०० टनांपर्यंत वाढवले आहे.

या बाबत कंपनीने ट्वीटर वरून माहिती दिली आहे. यात म्हटले आहे,

टाटा स्टील द्रवरूप  वैद्यकिय ऑक्सिजनचे उत्पादन ८०० टन प्रतिदिनापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आमची  कोविड विरुद्धची लढाई अजून चालूच राहणार आहे. आम्ही भारत सरकार आणि राज्य सरकारांसोबत अगदी जवळून काम करत आहोत, ज्यामुळे लोकांचे मौल्यवान प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा:

सुनील मानेच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा

कर्नाटक राज्यसरकार खरेदी करणार कोविड लसीचे १ कोटी डोस

परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल

आता अमेरिकेकडून ७.४१ अब्ज रुपयांची मदत

या सोबतच टाटा स्टीलने २४ क्रायोजेनिक टँकर्स आयात करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. त्यापैकी चार जर्मनीहून यापूर्वी भारतात आणण्यात आले आहेत. टाटा स्टील व्यतिरिक्त इतरही काही खासगी कंपन्या भारतात द्रवरुप प्राणवायू पुरवठ्याचे काम करत आहेत.

टाटा स्टील सोबतच सज्जन जिंदाल यांची जेएसडब्ल्यु, मुकेश अंबानी यांचा रिलायन्स समुह, नवीन जिंदाल यांची जिंदाल पॉवर आणि स्टील, लक्ष्मी मित्तल यांची आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इत्यादी कंपन्या देखील द्रवरुप प्राणवायू पुरवठ्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्याबरोबरच इतर अनेक खासगी कंपन्या देखील भारतातील द्रवरुप प्राणवायूचे उत्पादन, पुरवठा वाढावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

Exit mobile version