कोरोना विरुद्धच्या लढाईत ‘टाटा’ फुंकणार ‘प्राण’

कोरोना विरुद्धच्या लढाईत ‘टाटा’ फुंकणार ‘प्राण’

देशभर उसळलेल्या कोरोनाच्या विरोधात सध्या लढाई सुरु आहे. देश या लढाईत एकवटला आहे आणि कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करतोय. अशा परिस्थितीत कोरोना विरुद्धच्या लढाईत ‘प्राण’ फुंकण्यासाठी ‘टाटा’ पुढे सरसावले आहेत.

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. या परिस्थितीत देशातील रुग्णांसाठी प्राणवायू म्हणजेच लिक्वीड ऑक्सिजन खूप महत्वाचा आहे. देशात अनेक ठिकाणी कोरोना रूग्णांना आवश्यक अशा लिक्वीड ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक वापरासाठीचा लिक्वीड ऑक्सिजन हा वैद्यकीय वापरासाठी वापरला जावा या दृष्टीने भारत सरकारही प्रयत्नशील होते. अशातच टाटा समूहाच्या ‘टाटा स्टिल’ या कंपनीने देशाला लिक्वीड ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचे म्हटले आहे. रविवारी दुपारी टाटा स्टिलकडून यासंबंधीची घोषणा करण्यात आली. यासंबंधीचे ट्विट टाटा स्टिलच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आले आहे. टाटा स्टिलच्या या निर्णयामुळे देशातील असंख्य रुग्णांचे प्राण वाचवायला मदत होणार आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग

…. तर मी कोरोनाचे ‘जंतू’ देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते

ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना फक्त वसुलीच कळते

अरे मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात

“वैद्यकीय ऑक्सिजन हा कोविड रूग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय आवश्यकतेच्या या काळात प्रतिसाद देताना आम्ही दिवसाला दिवसाला २०० – ३०० टन लिक्वीड ऑक्सिजन हा देशातील विविध राज्य सरकारांना आणि इस्पितळांना पुरवणार आहोत. आपण या लढाईत एकत्र आहोत आणि आपण नक्कीच जिंकू.” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशाला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा देशासाठी पुढाकार घेण्याचा ‘टाटा’ समूहाचा इतिहास राहिलेला आहे. त्याचीच प्रचिती यावेळीही दिसली. देशाला लिक्वीड ऑक्सिजन पुरवणारे फक्त ‘टाटा’ नाहीत. मुकेश अंबानी, मित्तल समूह यांनीदेखील देशाला लिक्वीड ऑक्सिजन पुरवण्यात योगदान दिले आहे.

Exit mobile version