देशभरात हाय स्पीड गाड्यांच्या निर्मितीमध्ये पोलाद क्षेत्रातील अग्रणी टाटा स्टीलचा हातभार लागणार आहे. देशातील स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत या सेमी हायस्पीड गाडीच्या उत्पादनासाठी टाटा स्टीलचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
टाटा स्टील वंदे भारतासाठी डबे आणि आसने तयार करणार आहे. भारतीय रेल्वेने टाटा स्टील कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. रेल्वेने पुढील दोन वर्षांत २०० वंदे भारत गाड्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या करारानुसार टाटा स्टील दोन आठवड्यात एक वंदे भारत गाडीचे उत्पादन करणार आहे. टाटांनी पुढील एका वर्षात २२ वंदे भारतचे उत्पादन करण्याची घोषणा केली आहे.
टाटा स्टील प्रथम श्रेणी वातानुकूलपासून ते तृतीय श्रेणीच्या डब्ब्यांचे उत्पादन करण्यात येणार आहे. वंदे भारतसाठी एलएचबी कोच बनवण्याचे कंत्राटही कंपनीला देण्यात आले आहे. दोन वर्षांत देशात २०० वंदे भारत गाड्या चालवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुडे वर्षात वंदे भारत गाडीला शयनयान अर्थात स्लीपर डबे जोडण्याचीही योजना आहे. तयारीत आहे. रेल्वेने गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावरून शक्तिपीठ महामार्गाकडे
किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेंचे ‘पार्टनर’
१८० अंशातून फिरतील आसने
वंदे भारत गाडीची आसने १८० अंशांपर्यंत फिरू शकेल अशा पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत असे टाटा स्टीलने म्हटले आहे. १८० अंशातून आसन फिरू शकेल अशी वंदे भारत ही पहिलीच गाडी असेल असे सांगण्यात येत आहे. वंदे भारत मध्ये विमानासारख्या सुविधा मिळू शकतील