एअर इंडियातले भागभांडवल घेणार टाटा!

एअर इंडियातले भागभांडवल घेणार टाटा!

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI), सोमवारी टाटा सन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडला एअर इंडियामधील भागभांडवल संपादन करण्यास मान्यता दिली. एअर इंडियामधील समभागांच्या संपादनासह एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर इंडिया स्टॅस विमानतळ सेवांमधील टॅलेसकडून भागभांडवल खरेदीला मान्यता दिली.

सीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, एअर इंडिया लिमिटेड आणि एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडचे १०० टक्के इक्विटी शेअर भांडवल आणि टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे एअर इंडिया स्टॅस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड चे ५० टक्के इक्विटी शेअर भांडवल संपादन करण्याची कल्पना आहे.

सरकारने ८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते की, कर्ज बुडवलेल्या विमान कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी टॅलेसने बोली जिंकली आहे. टाटाने स्पाइसजेटचे प्रमोटर अजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील त्या संघाला १८ हजार कोटी देऊ केले.
२५ ऑक्टोबर रोजी, सरकारने टाटा सन्ससोबत संपूर्णपणे सरकारच्या मालकीची एअर इंडियाच्या विनिवेशासाठी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केली. या महिन्याच्या सुरुवातीला नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, टाटा सन्सला एअर इंडियाचे हस्तांतरण पुढील एक ते दीड महिन्यांत पूर्ण होईल.

हे ही वाचा:

मालगाडीने सुरू झाला होता, भारतातला पहिला रेल्वे प्रवास

माजी आयपीएस अधिकारी आर व्ही एस मणी यांना जीवे मारण्याची धमकी

पाकिस्तानला मात देत भारताने कोरले कांस्यपदकावर नाव

चिनी मोबाईल कंपनीच्या कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे

 

टॅलेस ही टाटा सन्स ची संपूर्ण मालकीची उपकंपनी आहे, ही होल्डिंग कंपनी आहे जी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) कोर गुंतवणूक कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे. शेअर खरेदी करार दर्शविते की, सरकारी मालकीच्या एअरलाइनचे ४६ हजार २६२कोटी कर्ज एअर इंडिया अॅसेट होल्डिंग लिमिटेड कडे हस्तांतरित केले जाईल आणि तब्बल ६१ हजार ५६२ कोटीच्या एकूण कर्जापैकी १५ टक्के कर्ज टाटा समूह राखून ठेवेल. सरकारला टाटांकडून सुमारे २ हजार ७०० कोटी रोख मिळणार आहेत.

Exit mobile version