संपूर्ण भारत आणि जागतिक बाजारपेठेतील विस्तार लक्षात घेता टाटा मोटर्सने शुक्रवार, २९ एप्रिल रोजी एक घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने आपल्या पोर्टफोलिओमध्ये इलेक्ट्रिकचा विस्तार करण्याच्या योजनांची घोषणा केली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी सांगितले की, टाटा मोटर्स देशात बॅटरी आणि सेमीकंडक्टर बनवण्यासाठी गुंतवणूक करणार आहे.
नवीन संकल्पनांची देखील चंद्रशेखरन यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये मागणी आणि बाजारपेठेत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीला भविष्यात इलेक्ट्रिक्स वाहने आपल्या व्यवसायाची गरज बनवण्याची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही आमच्या पोर्टफोलिओमध्ये २०३० पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तीस टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा करतो. २०२५ मध्ये लाँच होणाऱ्या आणि एका चार्जवर ५०० किमी पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या चारचाकी गाडीचे,जिचे नाव अविन्या आहे. तिचे अनावरण करताना चंद्रशेखरन यांनी हे सांगितले आहे.
अविन्या बद्दल ते म्हणाले, ही कार नवीन युग तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सने परिपूर्ण आहे. टाटा मोटर्स सध्या नेक्सॉन आणि टिगोर मॉडेल्सची इलेक्ट्रिक आवृत्ती विकते, जी पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे. टाटा मोटर्सच्या देशांतर्गत विक्रीचे प्रमाण आर्थिक वर्ष २२ मध्ये ६७ टक्के वाढले आणि आर्थिक वर्ष २१ मध्ये २.२ लाख युनिट्सच्या तुलनेत ३.७ लाख युनिट्सवर बंद झाले.
हे ही वाचा:
जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच
अमेरिकेतून कुरिअरमधून आणले २७ किलो मारीजुआणा ड्रग्ज; एकाला अटक
MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली
‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’
तसेच टाटा मोटर्सने इलेक्ट्रॉनिक वाहन प्रकल्पात विविध देशनांतर्गत कंपन्यांना सामील करण्याची योजना आखली आहे. याबद्दल चंद्रशेखरन म्हणाले की टाटा मोटर्स व्यतिरिक्त, टीसीएस, टाटा पॉवर, टाटा केमिकल्स आणि टाटा टाटा Elxsi यांचा समावेश असेल. आम्हाला अशा कार तयार करायच्या आहेत ज्या लोकांना आवडतात आणि त्यांना चालवायला आवडेल आणि खरेदी, ड्रायव्हिंग, चार्जिंग आणि सर्व्हिसिंग दरम्यान चांगला अनुभव येईल. त्यामुळे आम्ही लवकरच वाहनांची बॅटरी तयार करण्याचा उपक्रम सुरु करणार असल्याचे चंद्रशेखरन यांनी सांगितले.