Tata IPL 2022 Mega Auction: लिलावाच्या दुसऱ्या दिवशी काय होणार?

Tata IPL 2022 Mega Auction: लिलावाच्या दुसऱ्या दिवशी काय होणार?

Tata IPL 2022 Mega Auction चा आज दुसरा दिवस बंगलोर येथे पार पडणार आहे. दुपारी १२ वाजता खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात होईल. आज दिवसा अखेर आयपीएल २०२२ या स्पर्धेत खेळणाऱ्या दहा संघांची स्थिती काय असेल हे स्पष्ट होणार आहे. कोणते खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार आणि संपूर्ण चमू कसा असणार याचे चित्र आजच्या लिलावानंतर उलगडणार आहे.

लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल दहा खेळाडूंना एकूण दहा कोटींपेक्षाही जास्त रक्कमेची बोली लागलेली पाहायला मिळाली. पण आज तसे काही होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण पहिल्या दिवशी भरभरून बोली लावल्यानंतर आणि खरेदी केल्यानंतर अनेक संघांच्या पाकिटात फारच कमी पैसे शिल्लक आहेत, त्यामुळे अशी मोठी बोली आज बघायला मिळणे कठीण वाटते. पण तरीदेखील आपल्याला हवा असलेला खेळाडू संघात घेण्यासाठी दहा संघांचे मालक चांगलाच जोर लावताना दिसतील.

हे ही वाचा:

दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का

Tata IPL 2022 Mega Auction: ‘या’ होत्या पहिल्या दिवशीच्या महत्वाच्या घडामोडी

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

हिजाब वादाप्रकरणी आयबीने दिला पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा!

लिलावाच्या पहिल्या दिवशी हैदराबाद संघाने सर्वाधिक म्हणजे दहा खेळाडूंची खरेदी केली आहे. तर मुंबई संघाने सर्वात कमी म्हणजेच चार खेळाडूंची खरेदी केली आहे. तर पहिल्या दिवसा अखेर सर्वाधिक रक्कम पंजाब संघाकडे शिल्लक असून त्यांच्याकडे २८ कोटी ६५ लाख रुपये बाकी आहेत. तर लखनऊ संघाकडे सर्वात कमी म्हणजेच ६ कोटी ९० लाख रुपये बाकी आहेत.

रविवार १३ फेब्रुवारी रोजी लिलावाचा दुसरा दिवस पार पडणार असून दुपारी बारा वाजता लिलावाला सुरुवात होईल. यावेळी मुंबई इंडियन्स हा संघ संपूर्ण ताकदीनिशी लिलावात उतरताना दिसेल असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Exit mobile version