26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषजिओ विरुद्ध एअरटेल आणि टाटा

जिओ विरुद्ध एअरटेल आणि टाटा

Google News Follow

Related

देशात येऊ घातलेल्या ५ जी नेटवर्कसाठी बड्या कंपन्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ कंपनी सगळ्यात पुढे आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओकडून मुंबई आणि पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये ५ जी नेटवर्कच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता भारती एअरटेल व टाटा समूहाने इंटेलबरोबर व्यावसायिक सहकार्य करत ५ जी मोबाईल तंत्रज्ञानासाठी योजना आखली आहे.

भारती एअरटेलने ५ जी तंत्रज्ञानासाठी इंटेलचे तंत्र व्यासपीठ वापरण्याची योजना बुधवारी जाहीर केली. खुल्या ध्वनिलहरीचे जाळे (ओ-रॅन) त्यासाठी उपयोगात आणले जाणार आहे. भारती एअरटेलने यासाठी इंटेलबरोबर कामही सुरू केले असून काही शहरांमध्ये त्याची चाचणी घेण्यात येत आहे.

इंटेलच्या ‘ओ-रॅन’ मंचावर टाटा समूहही दाखल होऊ पाहात आहे. जपानच्या डोकोमोच्या साहाय्याने यापूर्वी दूरसंचार क्षेत्रात असलेल्या टाटाने ‘5 जी’साठी इंटेल तसेच एअरटेलबरोबर जाण्याचे निश्चित केले आहे. तंत्रज्ञानासाठी टाटा समूहातील टीसीएस ही कंपनी पुढाकार घेत आहे.

काही दिवसांपूर्वीच दूरसंचार विभागाने व्ही, एअरटेल आणि रिलायन्स जिओसह दूरसंचार ऑपरेटर्सना ग्रामीण भागात ५ जी तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास सांगितले होते. दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना शहरी भागात ५ जी अ‍ॅप्लिकेशन्सच्या चाचणीसह ग्रामीण भागातही या चाचण्या करण्यास सांगितले आहे. एमटीएनएलने दिल्लीत ५ जी च्या चाचण्यांसाठी सी-डॉटसोबत काम सुरु केलं आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ते नजफगडजवळ ५ जी टेस्ट करणार आहेत. कंपनीने शुल्क जमा केल्यानंतर त्यांना ट्रायल स्पेक्ट्रम दिलं जाईल.

हे ही वाचा:

बदलापूरमध्ये पूरपरिस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील कर्ज भाजपाने फेडले

परमबीर सिंग यांच्यासह ८ वरिष्ठ पोलिसांवर गुन्हा दाखल

चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार

दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह विविध ठिकाणी ५जीच्या चाचण्या घेण्यात येतील. या संदर्भात टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटरला ७०० मेगाहर्ट्झ बँड, ३.३-३-६ गीगाहर्ट्झ बँड आणि २४.२५-२८.५ गीगाहर्ट्झ बँडमधील विविध ठिकाणी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा