तस्लिमा यांनी सरोगेसीच्या मुलांना ‘रेडीमेड बेबी’ का असे संबोधले ?

तस्लिमा यांनी सरोगेसीच्या मुलांना ‘रेडीमेड बेबी’ का असे संबोधले ?

सरोगसी पालक बनण्याची प्रथा गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढली आहे. सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. सरोगसी करून जन्मला येणाऱ्या मुलांना त्यांनी ‘रेडीमेड बेबी’ असे म्हटले आहे. त्यांनी हे विधान अशा वेळी केले जेव्हा जगातील प्रसिद्ध जोडपे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी सरोगेट पालक बनण्याविषयीची माहिती चाहत्यांना दिली.

तस्लिमा ट्विटमध्ये काय म्हणाल्या?

‘सरोगसी केवळ गरीब महिलांमुळेच शक्य आहे. श्रीमंत लोकांना त्यांच्या स्वार्थासाठी समाजात गरिबीचे अस्तित्व हवे असते. जर तुम्हाला मुलांचे संगोपन करण्याची इतकी आवड असेल तर तुम्ही अनाथ मुलांना दत्तक घ्या. मात्र तुम्हला मुलांमध्ये तुमच्या गुणांचा वारसा मिळाला पाहिजे. हा निव्वळ स्वार्थ आणि अहंकार आहे. सरोगसीद्वारे रेडिमेड मुलं जन्माला घालणाऱ्या महिलांना आई झाल्याची भावना कशी येईल? जन्म देणाऱ्या आईसारखीच भावना तिलाही असेल का? असे प्रश्न तस्लिमा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये उपस्थित केले आहेत.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत’

पोटात लपवल्या होत्या हेरॉईनच्या ३८ गोळ्या

मुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर?

ओमायक्रोन सब व्हेरिएंट BA.2 ची देशात एंट्री

या प्रकरणावरून सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये दोन भागात विभागले गेले आहेत. काहीजण तस्लिमा यांच्या मताला सहमत झाले तर काहींनी विरोध केला आहे. काही वापरकर्त्यांनी तस्लिमा यांचे हे विधान प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्यासाठी आहे असे म्हटले आहे. यावर तस्लिमा नसरीन यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिले आहे की, सरोगसीबाबतचे त्यांचे विधान त्यांचे स्वतःचे मत आहे. याचा प्रियांका आणि निकशी काहीही संबंध नाही. मला हे जोडपे आवडते. बॉलीवूडमधील अनेक जण सरोगसीच्यामाध्यमातून पालक बनले आहेत.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, आमिर खान-किरण, शाहरुख खान-गौरी, प्रीती झिंटा, करण जोहर, तुषार कपूर असे अनेकजण कलाकार सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत.

Exit mobile version