आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ‘ठोको ताली’

आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ‘ठोको ताली’

आयपीएल २०२४ चे बिगुल वाजायला काही दिवस उरलेले आहेत. २२ मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीच्या सामन्याने यंदाच्या हंगामाला सुरूवात होईल. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नवीन हंगामात क्रिकेटचा थरार क्रिकेटप्रेंमींना अनुभवता येणार आहे. मैदानात चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीबरोबर नवज्योत सिंग सिद्धूच्या शेरोशायरी, हास्यविनोदाची आतषबाजी ऐकायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपासून दूर राहिलेले सिद्धू २२ मार्चपासून आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. सिद्धूने सोशल मीडियावर ही माहिती दिलेली आहे.

आयपीएलचा पहिला सामना २२ मार्च रोजी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. गतविजेता चेन्नई संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आयपीएल ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने नवज्योत सिंग सिद्धू यांना कॉमेंट्री पॅनलमध्ये घेतल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. ‘अत्यंत हुशार, महान नवज्योत सिंग सिद्धू आमच्या पॅनेलमध्ये सामील झाले आहेत. त्यांची अप्रतिम कॉमेंट्री आणि शानदार वन लाइनर्स चुकवू नका,’ असे ट्वीट स्टार स्पोर्टने केले आहे.

हेही वाचा :

गुजरात विद्यापीठात हाणामारीचे कारण फक्त नमाज नाही…

‘ऑडिटर रमेश’ यांच्या आठवणीने पंतप्रधान मोदी भावूक

पाकिस्तानच्या पीएसएलचे बक्षीस महिला आयपीएलपेक्षाही कमी

मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी वाद: सर्वोच्च न्यायालयाने मशीद समितीची याचिका फेटाळली

राजकारणात आल्यानंतर सिद्धूनी कॉमेंट्री करणे बंद केले होते. २०२४ मध्ये सिधूनी कॉमेंट्री सोडून राजकारणात प्रवेश केला होता. मात्र भविष्यात ‘ओह गुरू’ हे शब्द कधी ना कधी आपल्या कानावर पडतील, अशी आशा क्रिकेटप्रेंमीना होती. ते आता पूर्ण झाले आहे. आयपीएल २०२४ साठी कॉमेंट्री टीममध्ये सिद्धूबरोबर हर्षा भोगले, लक्ष्मण, निक नाइट, मॅथ्यू हेडन, जॅक कॅलिस, शिवरामकृष्णन, केविन पीटरसन आणि इतरांचा समावेश असणार आहे.

सिद्धूने टीम इंडियासाठी १३६ वनडे, ५१ कसोटी सामने खेळले आहेत. सिद्धूने १३६ वनडे सामन्यात ४४१३ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. सिद्धूने ५१ कसोटी सामन्यात ३२०२ धावा केल्या आहेत. त्यात ९ शतके, १५ अर्धशतकांचा समावेश आहे.

Exit mobile version