टांझानियातील लेक व्हिक्टोरिया येथे देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन्सचे विमान कोसळले आहे. विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच व्हिक्टोरिया तलावात बुडाले. टांझानियातील लेक व्हिक्टोरिया येथे शनिवारी झालेल्या विमान अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून २६जणांना वाचवण्यात यश आले आहे. या संदर्भात पंतप्रधान कासिम मजलिवा यांनी पत्रकारांना सांगितले की, विमानात चार क्रू सदस्यांसह एकूण ४३ लोक होते, त्यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २६ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टांझानियाच्या कागेरा भागातील बुकोबा येथील व्हिक्टोरिया तलावात शनिवारी प्रिसिजन एअरचे विमान कोसळले. प्रादेशिक पोलिस कमांडर विल्यम मवांपघाले यांनी बुकोबा विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, प्रिसिजन एअरचे विमान विमानतळापासून सुमारे १०० मीटर अंतरावर पाण्यात कोसळले. बुकोबा विमानतळाच्या धावपट्टीच्या शेवटी असलेल्या तलावाच्या किनाऱ्याजवळ हे विमान कोसळले.
हे ही वाचा:
‘अजित पवारांची कुणालाही गॅरेंटी नाही’
‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’
एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार
दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून ती मदत अद्याप नाही, पत्नीने केली विनंती
टांझानिया ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (टीबीसी) सांगितले की, विमानाने व्यावसायिक राजधानी दार एस सलाम येथून उड्डाण केले होते. जे सकाळी वादळ आणि मुसळधार पावसामुळे लेक व्हिक्टोरियामध्ये पडले. टांझानियाच्या सर्वात मोठ्या खाजगी मालकीच्या एअरलाईन प्रेसिजन एअरने कळवले की क्रॅश झालेले पीडब्ल्यू ४९४ बुकोबा विमानतळाजवळ येत होते. पण त्याआधीच ते कोसळले.