“मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार”

“मला काहीही झालं तर नाना पाटेकर जबाबदार”

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिचा खळबळजनक दावा

अभिनेत्री तनुश्री दत्ता ही पुन्हा एकदा सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने या पोस्टमधून अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे. बॉलिवूड माफियावरही तिने छळ केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच तिने इंडस्ट्रीतील काही लोक आणि पत्रकारांवर फेक न्यूज चालवल्याचा आरोपही केला आहे. अनेक लोक तिला टार्गेट करत असून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप तनुश्रीने या पोस्टमध्ये केला आहे.

तनुश्री दत्ता हिने पोस्ट करत म्हटलं आहे की, “मला कधीही काहीही झालं तर #MeToo चे आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, त्यांचे सहकारी आणि त्यांचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. कोण आहेत हे बॉलिवूड माफिया? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ज्यांची नावं पुन्हा पुन्हा समोर आली तीच लोकं,” असं तिने लिहिलंय.

“त्यांचे चित्रपट पाहू नका, त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाका. प्रत्येकजण त्यांच्या मागे लागा. त्यांचं आयुष्य नरक बनवा, कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. कायदा आणि न्यायव्यवस्था जरी अपयशी ठरले असले तरी माझा या महान देशाच्या लोकांवर विश्वास आहे,”

हे ही वाचा:

लोन अँप्सद्वारे भारताची आर्थिक कोंडी करण्याचा चीनचा प्रयत्न

“गावातलं गढूळ पाणी आम्हाला प्यावं लागत असताना अजित पवारांसाठी बॉटल?”

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत

महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला घ्यावी लागणार परवानगी

तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर MeToo चा आरोप केला होता. नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप झाल्यानंतर सिनेसृष्टीत खळबळ माजली होती. तनुश्री हिने सांगितल्यानुसार, २००९ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता. तनुश्री दत्ता शेवटची २०१० मध्ये ‘अपार्टमेंट’ या चित्रपटात दिसली होती.

Exit mobile version