स्टॅलिनची सटकली, अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह हटवले

‘₹’ चिन्ह नकोसे, हिंदी भाषेवरील रागापोटी सरकारचे पाऊल

स्टॅलिनची सटकली, अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह हटवले

तामिळनाडू राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या स्टॅलिन सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पीय लोगोमध्ये भारतीय चलनासाठी रुपयाचे चिन्ह ‘₹’ ऐवजी तमिळ अक्षर ‘रु’ लावले आहे. २०२४- २५ च्या अर्थसंकल्पाच्या मागील अर्थसंकल्पीय लोगोमध्ये भारतीय चलन चिन्ह ‘₹’ होते. २०२५- २६ चा अर्थसंकल्प १४ मार्च रोजी तामिळनाडू विधानसभेत सादर होणार आहे. त्यापूर्वी हे बदल करण्यात आले आहेत.

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये २०२५- २६ च्या अर्थसंकल्पाचा लोगो दाखवण्यात आला आहे. या लोगोमध्ये राष्ट्रीय चलन चिन्ह तमिळ वर्णमाला ‘रु’ ने बदलण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी), २०२० मध्ये प्रस्तावित केलेल्या तीन-भाषिक सूत्रावरून राज्य सरकारने केंद्र सरकारशी वाद सुरू केला आहे.

यानंतर भाजपाने स्टॅलिन सरकारवर निशाणा साधला आहे. तामिळनाडूचे भाजपा प्रमुख के अन्नामलाई यांनी सरकारचे हे पाऊल म्हणजे मूर्खपणाचे म्हटले आहे. द्रमुक सरकारचे राज्य अर्थसंकल्प २०२५- २६ हे एका तमिळ व्यक्तीने डिझाइन केलेले रुपया चिन्ह बदलते, जे संपूर्ण भारताने स्वीकारले आणि आपल्या चलनात समाविष्ट केले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही रुपयाचे चिन्ह बदलल्याबद्दल स्टॅलिन सरकारवर टीका केली आहे. “उदय कुमार धर्मलिंगम हे एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि डिझायनर आहेत, जे द्रमुकच्या माजी आमदाराचे पुत्र आहेत, ज्यांनी भारतीय रुपयाचे चिन्ह डिझाइन केले होते, जे भारतने स्वीकारले होते. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन तामिळनाडूच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून हे चिन्ह काढून टाकून तमिळ लोकांचा अपमान करत आहेत. हे किती हास्यास्पद असू शकते? अशी टीका मालवीय यांनी केली आहे.

हेही वाचा..

१३ महिन्यांत भारतात घुसू पाहणाऱ्या २ हजारहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

हिंदुत्व सोडणाऱ्या उबाठाला आता हिंदू सण आठवले, आदित्य ठाकरेंचा हा खोटारडेपणा!

‘केबीसी’च्या १७ व्या सीझनचे पुन्हा होस्ट असतील अमिताभ बच्चन

‘शाहिद आफ्रिदी धर्म बदलण्यास सांगत असे, भेदभावामुळेच कारकीर्द संपली!

मागील दोन अर्थसंकल्पांमध्ये, राज्याने त्यांच्या लोगोसाठी रुपया चिन्हाचा वापर केला होता. २०२४-२५ च्या राज्य अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये रुपयाचे चिन्ह होते. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातही हे चिन्ह ठळकपणे दाखवण्यात आले होते, जे आयआयटी- गुवाहाटी येथील एका प्राध्यापकाने डिझाइन केले होते, जे योगायोगाने द्रमुक नेत्याचे पुत्र आहेत. एखाद्या राज्याने राष्ट्रीय चलन चिन्ह नाकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

काँग्रेसी ताजे टूलकीट जोडते ‘वक्फ’च्या मनमानीचा विकसित भारताशी संबंध... | Dinesh Kanjl | Waqf Board

Exit mobile version